नभासारीखे रुप या राघवाचे । मनी चिंतीता मूळ तुटे भवाचे ।। नभ म्हणजे काय? नभासारीखे रूप म्हणजे काय? इतकेच सांगता येईल की, त्याचे चिंतन केले किंवा आकाशासारख्या रंगात जर तो अह:र्निशी चिंतनात राहिला, तर त्याला काही न्यूनता नाही. त्याचे सर्व शरीरात रूप भिनले जाते.
भव म्हणजे काय? आणि भय म्हणजे काय? संसारात भक्ताला कोणत्याही…
आजचा महान दिवस आहे. किती मानव त्या ठिकाणी तल्लीन झाला आहे ! पण कोणी शोध घेतला आहे का? तो आपल्या कृतीने रममाण झाला आहे, पण कोणी शोध घेतला आहे का? कोणीही बोट दाखविणार नाहीत की, या ठिकाणी विठ्ठल हे तत्त्व आहे. असे ओळखणारे फार थोडे आहेत, पण शक्ती नाही. शक्ती आहे पण भक्ती नाही, श्रद्धा…
मी कोण, कोठे जाणे आहे, कोठून आलो, हे त्याला सापडत नाही. तेव्हा त्याला स्थिर करण्यासाठी तत्वे निर्माण केली. सर्वश्रेष्ठ असे जे पद म्हणजे सद्गुरू पद ! त्यांच्या सानिध्यात गेलात की, त्याचे सर्वस्व शुद्ध होत असते. मानव सत मार्गाने जाता जाता, त्याचे मन पूर्णत्वाने अर्पण होते, अन मग तो त्या ठिकाणी स्थिर होतो. तोच प्रकाश! त्या…
हे कलियुग आहे. हा कलीचा महिमा आहे, त्यामुळे मानवांची मने क्षणाक्षणाला पालटतात. सत्याची चाकोरी मानवाला अनुसरावी वाटते, पण मनाची द्विधा स्थिती असली की, तो चाकोरीच्या बाहेर जातो.
परमनिधान तत्वाने मानवांची मानवता सिद्ध करण्यासाठी अनेक तत्त्वे निर्माण केली आहेत. ही कशासाठी? तर मानव देह श्रेष्ठ…
सत भक्तीसाठी प्रकृतीमध्ये एवढे स्नेह आहेत, ते सत चरणात निमग्न होऊन ओलावले असतील, तर एकाच ठिकाणी स्थीर राहतात. मन अमृतमय झालेले असते. रसना, प्रेम जर अमृतमय झाले, मग मन कोठे जाईल? जी इंद्रिये आहेत, ती सद्गुरुमय झाल्यानंतर इकडे तिकडे होतील का? भक्तीला प्रथम प्रेम पाहिजे. ते प्रेम शुद्ध असेल तर मन आकळता येते.
स्नेह…
श्री समर्थ मालिक म्हणताहेत, त्या अखंड सत् तत्वाची गती मिळवून दिली, त्या अखंड तत्त्वापासून कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर काय होते, काय नाही, खरे किती, खोटे किती याचा सेवेकऱ्यांनी बोध घ्यावा. पण हे करताना त्या सेवेकऱ्याची कृती मात्र सत् पाहिजे. मी सत् किती करतो, असत किती करतो, याचे मायेत राहून सताचे घर्षण करणे, सानिध्य मिळविणे, त्याचा पूर्ण…
आता इतकेच, काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळली आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण कोणत्याही स्थितीत शोधा-शोध केली, तर आपणास कळेल की, हे अखंड नाम कोणत्याही ठिकाणी दिले जात नाही.
येथे सांगितले जाते, ते अनुभवातले सांगितले जाते. प्रत्यक्ष सहजासहजी विषय निघाला की त्याच्यावर प्रवचन…
रामदासांचे उदाहरण घ्या. रामदासांना थंडी वाजून आली, त्याच वेळेला शिवाजी महाराज त्यांना भेटावयास आले. रामदास स्वामी आसन सोडून बाजूला झाले. दोघे भेटत असताना, फक्त ते आसन हलू लागले. कापू लागले. शिवाजीला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, “महाराज हे काय?” “हे प्रारब्ध आहे. आपण भेटायला आलात, आपले बोलणे, भाषण व्हावे म्हणून त्याला बाजूला ठेवले.”
त्यांना ते…
श्री समर्थ मालिक - सेवेकरी चकतो का? कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार नाहीत. जो सेवेकरी येथे ऐकतो व बाहेर गेल्यानंतर विसरतो, त्याला अनेक विवंचना निर्माण होतात व त्यातच तो गुरफटला जातो.
खरोखरच येथील सेवेकऱ्यांजवळ एवढे अखंड तत्व सतत पाठीशी उभे असताना,…
तुकाराम महाराज - “ब्रह्मानंदी लागली टाळी। कोण देहाते सांभाळी ।।’’ ही टाळी लागल्यानंतर नारायणाला शोधण्यास कोठेही जावे लागत नाही. स्वर्गात, मृत्यूलोकात कोठेही जावे लागत नाही, तर त्याचे अस्तित्व सतशुद्ध (चरणातच) अंत:करणात असते. त्याला शोधण्यासाठी सतशुद्ध आचरण ठेवले पाहिजे, मग अनंत लांब नाहीत. त्याचे साधन एकच हे नाम आहे. सतशुद्ध सात्विक आचरण आहे. अशा तऱ्हेने नाम…
श्री संत तुकाराम महाराज - मी महान नाही. मी कोणत्या गतीने महान आहे. गती देणारा घेणारा फार वेगळा आहे. तो पांडुरंग फार वेगळा आहे. त्यांचा कोणीही अंत लावलेला नाही अगर लावू शकणार नाहीत. माझ्यासारख्या पामराला महान म्हणणे बरोबर नाही. जे महान आहे तेच ते पांडुरंग फार निराळे आहेत. प्रणव देणारे अन घेणारे तेच आहेत.…
श्री स्वयंभू - श्री हरि म्हणा, वासुदेव म्हणा, नमः शिवाय म्हणा, काही म्हणा हे सर्वस्व असले तरी, ते सर्वस्व एकाच चरणाजवळ लिन आहेत हे पाहणे आहे. सर्व देवाधिदेव श्रीहरी, महादेव कुठे लिन आहे तर एकाच चरणाजवळ ! तेच चरण जर सापडले तर तो महद भाग्यवान आहे. त्याच चरणांचे आपण सेवेकरी, दास, रज:कण आहोत. ते चरण…