श्री समर्थ एकचित्त –
सृष्टी नियमाप्रमाणे जी घडण घडावयाची असते, ती घडवून घ्यावी लागते. कार्य चालू आहे. कालगतीप्रमाणे मागे पुढे होते. त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. जे होते ते चांगल्यासाठीच होते. वाईट झाले, तर वाईटातून सत् प्रेरीत बीज बाहेर पडते. वाईट कृत्य दिसायला दिसते, पण त्यातूनच चांगले पैदास होऊन बाहेर पडते.
कोणतीही घडण घडविण्यासाठी काहीतरी…
दीपावली किंवा दिवाळी हा सण म्हणजे "अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप" म्हणजे…
श्रीसमर्थ मालिक - प्रत्येक सेवेकऱ्याची योग्यता महान पदाची आहे. सेवेकऱ्याने वाटचाल करीत असताना सद्गुरु मूर्ती डोळ्यासमोर ठेवून अखंड ठेवा जो बहाल केलेला आहे, त्याचे मुखाने नामस्मरण करीत वाटचाल केली, तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच !
सत् मिळणे फार दुरापास्त आहे. रिद्धी सिद्धीच्या कोनातून वाटचाल कराल, तर आपली गती त्या चांगदेवासारखी होईल. आपल्या प्रभावाने चांगदेवाने सुद्धा…
मालिक – सत् शोधण्यात जरी कालावधी लोटला, तरी हे सत् आहे की नाही, हे अजमावण्यात येते, म्हणूनच अवधी जात असतो.
मानव भक्ती करताहेत. कोणती कां होईना? इथपर्यंत आले नाहीत, तरी त्या तत्वापर्यंत जातील. यामुळे लक्ष देण्यात आले नाही. फक्त त्याचा आढावा केव्हा घेण्यात येतो, ज्यावेळेला प्रत्यक्ष आसन या भागात पडले, त्यामुळे कार्यात लक्ष घालावे…
शकुंतला - स्थूलातील प्रत्येक ज्योतीला सुख दुःख संसार असतो. परंतु संसारात प्रत्येकाला सुख पाहिजे असते. सध्याच्या मानवाला संसारात सुखच आहे. त्या अरण्यातील भयंकर श्वापदे, वाघ, सिंह यांची आठवण झाल्यानंतर विचित्र स्थिती निर्माण होते. त्यावेळेला इतके अतोनात कष्ट काढले, दुःख भोगले, तरी प्रत्यक्ष पित्याला दया आली नाही. ज्या ठिकाणी असत, त्या ठिकाणी आदर तरी कां द्यावा?…
सौ. माधवी - महामूनि कण्व यांची पत्नी - विश्वामित्र आश्रमात आले, त्यावेळेला त्यांच्या कमरेला सर्पाने विळखा घातला होता. आता पण अशी स्थिती आहे. पण हा साप निराळा आहे. त्यावेळी त्या मातीच्या सर्पाला मालकानी संजीवनी देऊन त्याच्याकडून कार्य करून घेतले. तेच सत् आहे.
आश्रमात २००…
सौ. माधवी - जगात ईश्वर नाही म्हणून चालणार नाही. सर्वांनी एकच निश्चय करणे. जरी मी सेवेकरी आहे तरी संसारात आहे. त्याच्यात जो वेळ मिळेल, तो सत्कार्यात घालवीन. असताची बाधा होऊ देणार नाही.
आपल्या स्थूलांगी सेवेकऱ्यात काहींचे एक तर काहींचे निराळे असते असे मालिक सांगतात, आसनाधीस्त सांगतात, पण घरातील कृती कोण पाहते? त्रिभुवनात एकही ठिकाण…
ऋषीपत्नी सौ माधवी – कण्व मुनींची अर्धांगी. आपल्या स्थूलांगी सेवेकऱ्यांच्या संसारात काही वेळेला वाद उत्पन्न होतो. अनेक वेळेला आसनाधिस्तांनी सांगितले आहे, संसार करुनच परमार्थ साधावा. त्याशिवाय परमार्थाची जाणीव मिळणार नाही.
तुमचा संसार लहान आहे. मोठा नाही. सध्याच्या सेवेकऱ्यांना चार पाचच मुले असतील. त्यावेळी आश्रमात किती मुले येत होती? ती सर्व आश्रमातच राहत होती. त्यांना…
श्री गुरुदेव पितामह - पूर्वी होऊन गेलेल्या युगाची मानवांना गणती आहे कां?सत् आणि असत ! पूर्वींचे सतयुग, आता कलियुग दाखवित आहे. नव्हे, दोन्ही युगे चालू आहेत. जो पूर्णांगी सत वागतो तो सतयुगातला आणि जो असत वागतो, तो असत युगातला होय, म्हणजे कलियुगातला होय.
आदीअंतापासून अवतार कार्ये चालू आहेत याची गणना मानवाने केली आहे कां?…
*आरती सद्गुरुंची उजळली अंतरी |* *प्रकाश थोर झाला, साठवेना अंबरी ||*
लक्षात घ्या नाम केंव्हाही घेऊ शकता, परंतु ते नाम सताप्रत पोहचविण्यासाठी मन सद्गुरू चरणांवर अर्पण करुनच नामस्मरण केले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता या स्थिती एकत्र होतील त्याचवेळी मन स्थिर होईल. सतात पूर्णत्व लय होणे म्हणजेच स्मरण करणे. अशा स्थितीत आपण नामाची…
श्री समर्थ मालिक - सेवेकरी म्हणतात कि, मालिक तुम्हीच करून घेणार आहात. पण हे तत्व कसे आहे कि, यात कोणीही मिलन होऊ शकणार नाही. सतमय जे आहे तेच सत् ! तेच ब्रह्म ! तेच समर्थ ! आपल्यातच आहेत. तेच आपणाला उपदेश सांगतात. म्हणून दिलेला अखंड नामाचा उजाळा करणे, पण ते कोणी करीत नाही.
स्थुलाला…
आदेशाप्रमाणे मानवाला जन्माला घातला. जन्माला घातल्यानंतर पुढे ज्ञानबीजाचा अंश फेकला जातो. ज्ञानबीजाचा अंकुर फुटल्यानंतर, अशाप्रकारे सतामध्ये रममाण झाल्यानंतर तो सर्वस्व सारख्या दृष्टीने पाहतो. किती जरी मानवांनी त्रास दिला, तरी तो आपले कर्तव्य सोडून दुसऱ्या चाकोरीने जाईल काय? त्याला पूर्ण माहीत होते, हे कोण करते आहे. म्हणून संतांनी सत् चाकोरी कधीही सोडली नाही. हे सत्य आहे…