दरबार हा दरबार आहे. आसन हे आसन आहे ! ज्या ठिकाणी बसाल त्या ठिकाणी दरबार आहे. त्या ठिकाणी आसन आहे. स्थुलाचे विवेचनावर पुढे निवेदन होईल. सेवेकर्यांचे सर्वस्व कोडकौतुक पुरविण्यात येईल. चारही देहावर विवेचन करण्याची वेळ आली तर जरूर विवेचन करण्यात येईल.
जशी संघर्षणे होतात, तसे सताकडून आदेश सुटत असतात. जे खेळ खेळावयाचे ते प्रत्यक्ष…
सृष्टी नियमाप्रमाणे जी घडण घडावयाची असते, ती घडवून घ्यावी लागते. कार्य चालू आहे. कालगतीप्रमाणे मागे पुढे होते. त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. जे होते ते चांगल्यासाठीच होते. वाईट झाले तर वाईटातून सत् प्रेरीत बीज बाहेर पडते. वाईट कृत्य दिसायला दिसते, पण त्यातूनच चांगले पैदास होऊन बाहेर पडते. कोणतीही घडण घडविण्यासाठी काहीतरी निमित्त काढावे लागते.
एवढेच,…
भक्तिला प्रथम प्रेम पाहिजे. भाव पाहिजे. पण तो कसा पाहिजे? तर शुद्ध स्फटिकासारखा पाहिजे. प्रेम पाहिजे. रसना ओलावल्या मग त्याच अमृतमय होतात. पण त्याला प्रकृती कशी हवी? हे कशाने होईल? कसे होऊ शकते? रसना ओलावण्याकरिता काय पाहिजे? याला स्वतःचा पाया, घर मजबूत पाहिजे. प्रकृती शुद्ध पाहिजे. प्रकृती शुद्ध झाल्यानंतर मग वेळ आहे का? भूमी शुद्ध…
जो सेवेकरी सत् मार्गाने चालला आहे, तो मात्र शुद्ध अंतःकरणाने लीन होऊन सत् गतीने वाटचाल करतो, तोच ओळखू शकतो, करतात ते मालिक करतात. मी निमित्त आहे. असे जेव्हा सेवेकरी म्हणेल, मग मात्र त्याला बोधामृत चाखावयास मिळेल. सेवेकऱ्यांनी आपल्या कर्तव्यात (नामस्मरणात) जागृत राहणे, त्याचा उजाळा करणे. त्याचा उजाळा झाला की, प्रकृतीचा उजाळा होतो. प्रकृती जोपर्यंत अभिन्न…
अखंड सत् तत्वाची गती ज्यानी मिळवून दिली, त्या अखंड तत्त्वापासून कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर काय होते, काय नाही, खरे किती, खोटे किती याचा सेवेकऱ्यांनी बोध घ्यावा. पण त्या सेवेकऱ्याची कृती सत् पाहिजे. ती कोणत्या तर्हेची पाहिजे? मी सत् किती करतो, असत किती करतो, मायेत राहून सताचे घर्षण करणे, सानिध्य मिळविणे, त्याचा पूर्ण अंत:करणापासून उजाळा करणे, म्हणजे…
भक्ती करणे दुरापास्त आहे. ती कोणाला ठसली जात नाही. ठसली तरी अडीअडचणी निर्माण होतात. पण पूर्वजन्मीचे गाठोडे असेल तर तो त्याची पर्वा करीत नाही. आपली चाकोरी सोडत नाही.
हल्लीच्या परिस्थितीत गती मिळणे, चाकोरी मिळणे दुरापास्त झाले आहे. आयुष्य घालवेल पण सत्य परिस्थिती बाजूला राहीली.
आपल्या येथे अजमावले जाते, सांगितले जाते, तसे कुठेही सांगितले…
पूर्वी भक्तीला जरी त्रास होत असला तरी त्याला प्रतिसाद मिळण्याला बरीच मदत होत होती. हल्ली भक्ती करणारे फारच तुरळक आहेत. जरी असले तरी त्यांची निंदा नालस्ती होते आणि परिस्थिती ही प्रतिकूल आहे. पूर्वीपेक्षा हल्ली भक्ती साधी आणि सोपी आहे. तसे पूर्वी नव्हते. पूर्वी फार कसून घेतले जात असे. हल्ली तसे कसून घेतले जात नाही. …
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: ! गुरु: साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः !!
ॐ नमोजी सद्गुरू परब्रह्म ! ॐ श्री गुरुदेव दत्त ! अशा श्री सद्गुरूंना समस्त गुरुबंधू भगिनींचे शतशः प्रणाम !!
शुभ दिन म्हटले की भक्तांना एक पर्वणीच असते. मे महिना हा त्यातीलच एक खास मास ! या मासामध्ये आपल्या आश्रमाचे एकूण तीन कार्यक्रम…
म्हणून भक्ति कोणत्या अंगाने करावयास पाहिजे? सेवा कोणत्या अंगाने करावयास पाहिजे? हे मी सांगावयास पाहिजे का? प्रत्येक सेवेकऱ्याने याचे अंत:र्यामी शोधन करा. त्याप्रमाणे वाटचाल करा. पुढे सत् संचित, सत् सानिध्य लाभेल कसे याचा विचार करा. येथून पुढे असत संचित वाढवण्याचा प्रयत्न करू नये. आतापासूनच स्फटिका सारखा शुद्ध राहिला तर पुढे सत् सानिध्य त्याला लवकर मिळेल.…
आत्मा म्हणजे काय? तर, आत असणारी ज्योत, चैतन्य । जडत्वाच्या आत असणारे, चत्वार खाणीत असणारे, सर्व ठिकाणी आकाराच्या आत असणारे, स्वयमेव तत्व तोच आत्मा । त्याच्या प्रकाशाने वाटचाल करणे याचा बोध कोणी घेतला आहे कां?
अकार व उकार या दोन्हींचा संवाद चालतो. तो बोध कोणी घेतला आहे का? जडत्वात स्वयमेव तत्व जर नसेल, तर…
सद्भावनेने, भाविकतेने ज्या ज्योतीने जे बहाल केलेले आहे ते समाधीवर रुजू होणारच. पूर्ण श्रध्देने केलेले कार्य, कोणते कां असेना सद्गुरु चरणांवर रुजू होते. त्यामध्ये सद्भावना सतगती नसेल तर ते होणार नाही.
मनुष्य हाच ईश्वरी अवतार आहे आणि त्यातच सर्वस्व बीजारोपण आहे, पण मानवाला त्याची जाणीव नसते. त्याची जाणीव होण्यासाठी मनुष्य देह आहे. प्रत्येक मनुष्य…