आपले सद्गुरू कसे आहेत, ते कोणत्या रितीने सांगत आहेत, त्याचा अंत घेणे. या कुडीतून अविनाशी आत्मा बाहेर पडेपर्यंत त्यांना एकदा तरी डोळे भरून पाहणे. ज्यांनी पाहिले, अंत घेतला, तोच भाग्यवान होय.
अंत घेणे जितके कठीण, तितकेच ते सोपे आहे. आपला सेवेकरी वाममार्गी गेला, तरी सद्गुरु त्याच्यासाठी किती…
कपिल मुनी - आपले सेवेकरी मोठे आहेत. त्यांनी लहान मुलांप्रमाणे आंतून बाहेरुन शुद्ध होणे. जे आपले बोल, ते सतच काढणे. तो बोल झेपेल तसाच काढणे. काही मानव सेवेकरी जी गोष्ट नको, त्या गोष्टींकडे वळतात. कांहीना अन्न वस्त्र सुद्धा मिळत नाही. जे या बाबतीत श्रीमंत आहेत, ते अशा माणसांकडे लक्ष देत नाहीत. ते आपल्याच मायावी मी…
अलख - कोणाला सेवेकरी म्हणायचे? सेवा दिली तो सेवेकरी नव्हें ! तन, मन, धन एव्हढेच नव्हे, तर मनाच्या पलीकडचे जे चित्त ते सदगुरू चरणांवर अर्पण करावयाचे असते. असे ज्याने केले, तो सेवेकरी होय.
हा दरबार साधा नव्हें, दैवतांचा तर नव्हेच नव्हें आणि शक्तीचाही नव्हें अगर त्रिगुणात्मक सुद्धा नव्हें. त्या पलीकडचा हा दरबार आहे. …
एखाद्या सेवेकऱ्याचा अनुभव, आजच्या दर्शनाचे वर्णन, आजपर्यंत जी सेवा केली त्याचे प्रतिक, त्याचे दर्शन, वर्णन तेच प्रत्येक सेवेकऱ्याने ध्यानात घेऊन सदगुरु चरणांचा लाभ घेत घेत आपणाला कोणत्या ठिकाणी जावयाचे ते लक्षात ठेवणे.
प्रत्येक सेवेकऱ्याने, आपल्या सदगुरुंनी सत् पदाच्या आसनावरून जे अखंड नाम दिले आहे, त्याचेच नामस्मरण करने, त्यात निमग्न राहणे. आपले मालिक आपल्या पाठीवर…
श्री समर्थ मालिक – “समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे ||जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||”
समर्थांचा जो सेवेकरी आहे, जो सत आहे, तो सत् मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला समर्थांशिवाय, एकाच तत्त्वाशिवाय काही दिसत नाही, असा सेवेकरी अह:र्निश चरणात लिन झालेला असतो. त्याच्यावर शत्रु, चोर,…
अक्षय - सद्गुरु कृपेनें २ ते २|| हजार वर्षांपूर्वी ज्याची तहान लागली, ज्याचे चिंतन करीत बसलो, त्या सद्गुरु माऊलींचे अखंड दर्शन व्हावे ही इच्छा आहे. भीमा आणि घोड नदीचा जेथे संगम त्या ठिकाणी असतो.
मायेच्या जाळ्यात गुरफटणाऱ्याला, अखंड दर्शन नाही. ते जाळे तोडून गेल्यानंतरच दर्शनाचा लाभ मिळेल.…
अलख - नामस्मरण त्या वृत्तीचे, त्या पदाचे केल्यास, तो मार्ग आपणास मिळेल. त्यासाठी जागे झाले पाहिजे. दोन मिनीटे का होईना, सर्वस्वाचा विसर पडून, तन्मय व्हावयास पाहिजे. सेवेकरी जरी थोडे चुकले, तरी मालिक त्याला फांसावर चढवणार नाहीत. पण हे का चुकले त्याचा त्यांनी विचार करावा. शेवट शेवट हे घ्यावे लागते, म्हणजेच सेवेकरी सुधारतो. म्हणून सेवेकऱ्याने सुधारावे.…
आपले आसनावर बसलेलें सदगुरू कसे आहेत? ते आतून बाहेरून पहा. प्रयत्न करा. मालिक व आसनाधिस्त निराळे नाहीत. एकच आहेत. ही सर्व माया नटविली आहे. आपण सत कृतीने कार्य करीत असता, त्यात बिघाड झाला तर ते कार्य फुकट जाते.
हजारो वर्षे तप:श्र्चर्येत गुंग असणाऱ्या तपसव्यांना अजून दर्शन नाही.…
मालिक प्रत्येकाच्या हृदयरुपी पिंजऱ्यात दडून बसले आहेत. प्रत्येकाच्या हृदयात ते वास करुन आहेत.
मानव म्हणजेच ईश्वर! मग तो कोणत्या रितीने वागतो, कोणत्या रितीने कृती करतो, ती कृती सर्वस्व सत असली, तर सेवेकऱ्यांचाच फायदा आहे. पांच मिनिटे का होइना, सर्वस्व विसरून, एकाग्रतेने, तन्मयतेने मालकांच्या ध्यानात गुंगून जाणे, म्हणजे…
अलख - सेवेकऱ्यानीं कोणत्या तऱ्हेने भक्ती म्हणजे नामस्मरण करावे? सेवेकरी नामस्मरणात बसले असताना, जर ध्यान दूसरीकडे गेले, तर सत् पदाचे दर्शन कसे मिळेल? भक्ती सहज, साधी, सोपी आहे. ती कोणाला? अहंपणा व गर्व ज्याच्या ठिकाणीं नाही त्यांना ! त्यांना दर्शन सहज मिळते.
तो अहंपणा गर्व नाहीसा करण्याकरीता…
मायावी कवचात दडून, सेवेकरी काय काय करतात याची सर्व नोंद आहे. सेवेकऱ्यांनी लक्षात ठेवणे, जे बाबा आसनावर आहेत, ते कोणत्या रितीने आणि केव्हा कस घेतील, याची जाणीव देणार नाहीत. एवढे लक्षात ठेवणे, कस जरी घेतला, तरी दुसऱ्याच्या दारावर भिक मागण्यास ते लावणार नाहीत. प्रत्येक सेवेकऱ्याने धडपड करणे. मनाचा ठाम निश्चय करून, आपल्या सद्गुरुंचे दर्शन घेण्याचा…
भक्ती कशाला म्हणतात?
प्रत्येक सेवेकऱ्याच्या अंगी लिनता, नम्रता आणि शांती असलीच पाहिजे. जे जे सेवेकरी सांगितलेल्या वळणाने चालतील, त्याबाबत आपणांस सर्वस्व माहीत झालेले आहे. मग त्याप्रमाणे वागावयास नको का? प्रत्येक सेवेकऱ्याच्या पाठीमागे मालिक छायेसारखे असतात. मग त्यांनी घालून दिलेल्या वळणाने वागावयास नको कां? …