प्रथम आमच्याही मनाची अशी धारणा होती की क्षिराब्धी म्हणजे सर्वस्व! अन ही सर्वस्व अवतार कार्य क्षिराब्धीनींच घडविली आहेत अशी मनोभावना होती. परंतू आता तुम्ही सेवेकर्यांनी हे लक्षात घ्या, अनंत म्हणजे किती अफाट शक्ती आहे. जी २५ अवतार कार्य झाली, त्या अवतारात महाबलाढ्य अशा अघोरांचा नाश स्थूलाने झाला, परंतु त्यांची सूक्ष्मे मात्र तशीच राहिली अन त्यानंतर त्यांनी सर्वस्व भ्रष्टाचार माजविला. या सर्वस्वांचा नाश करण्याकरिता अनंतांनी, हस्ते परहस्ते हे सर्वस्व घडवून आणले.
हळूहळू या आसनाजवळ दैवते येऊ लागली, नाथ येऊ लागले, कपिल मुनी आले. हे सर्वस्व घडविले कोणी? तर अनंतांनी! हळूहळू या आसनाजवळ कार्य घडू लागली अन मग अनंतांनी संदेश सोडले,”आसनाधिस्त! अघोरांचा नाश केला पाहिजे.” या आसनाजवळ प्रथम एकचित्त ज्योत कोण, तर राधा! सर्वात प्रथम या आसनाला नाथांच्या जोडीने मदत करणारे दैवत म्हणजे मांढरा काळू! पिशाश्चांचा नाश करत करत हळूहळू शुद्धीकरणास सुरुवात झाली. अन संदेश आले,”अघोरांचा नाश करा!”
प्रथम आसनाजवळ जी ज्योत शुद्धीकरणासाठी आली ती म्हणजे कमल साटम! आसनाने एकदा कर्तव्य हातात घेतल्यानंतर कधीही अर्धवट सोडून देत नाही. या कमल साटम ज्योतीच्या शुद्धीकरणास सुरुवात झाल्यानंतर असा अनुभव आला की आसनाजवळ ज्योत आल्यानंतर कोणताही त्रास नाही, परंतु घरी गेल्यानंतर पुनश्च त्रासास सुरुवात होते. मग अनंतांनी गुप्त संदेश घेण्याचे आदेश दिले. गुप्त संदेशात त्यांनी सांगितले की अवतारकार्यात महाबलाढ्य अशा अघोरांचा नाश केला. परंतु त्यांची सूक्ष्मे तशीच आहेत. पण जोपर्यंत शुक्राचार्याला तुम्ही आसनाप्रत घेऊन येत नाहीत अन त्याची संजीवनी आसनावर तो काढून ठेवत नाहीत, तोपर्यंत या अघोरांचा नाश होणे शक्य नाही. अनंतांनी सांगितले की माझ्या संदेशाप्रमाणे तो आसनाजवळ येईल अन संजीवनी अर्पण करेल, त्यावर आपण त्वरित बंधन करा. हे घडल्यानंतर त्या कमल साटमच्या शुद्धीकरणास गती मिळाली. परंतु अघोरांनी देखील आपली शक्ती पणाला लावली होती. आम्हीही ज्योत जाऊ द्यायची नाही असा निश्चय केला होता..©️
