Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपणाला माहित आहे कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – ही भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे की त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र, याबरोबर तुम्ही करू शकत …

मना सज्जना…२ ©️

मना सज्जना…२ ©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल कर. बरेच जण देवळात जातात, कोणी लोटांगण घालून घेतात तर कोणी जोरजोरात घंटा नाद करतात आणि आपली देवावरची श्रद्धा, भक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु देवळातली दगडाची मूर्ती काही करते का हो? परंतु जागृत मूर्ती मात्र सर्व काही करते.

आत वास करणारे म्हणते,”अरे जे काही करतोस हे सर्व तू करतोस.” त्यावेळी ते तुझ्यात वास करणारे आहेत त्याची तू जाण घेतोस का? काही लोक आपण पाहतो की कपाळाला गंध टिळे लावून स्वतःला पांडुरंगाचा सेवेकरी म्हणवतात आणि भजने, कीर्तने करतात. परंतु तुम्हीच सांगा अशाने पांडुरंग प्राप्त होतो का? आणि हे करत असताना तुमचे आतले मन स्थिर राहू शकते का? अरे बाह्य अंगाने निरनिराळे वेश परिधान करून आपले मन स्थिर राहू शकेल का? अरे आत वास करणाऱ्या सताचा, सद्गुरूंचा माग तुम्ही काढू शकणार आहात का? तुमच्या मनाची एवढी कुवत आहे का? काही सेवेकरी दरबारातून घरी गेल्यानंतर सद्गुरूंबद्दल काही प्रणव काढतात, त्यांना वाटते सद्गुरु आपल्या बरोबर नाहीत, त्यांना थोडेच कळणार आहे? यातच खरी मेख आहे…©️

You cannot copy content of this page