साक्षात मालकांचे बोल – मानव धर्म श्रेष्ठ ! मानव धर्माचा उद्धार करणे श्रेष्ठ ! या दोहोंमध्ये मनुष्य श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ याचे विवरण केले. ज्या ठिकाणी नाम सर्वस्व आहे. सहज साधारण नाम म्हणजे भक्ती !
नाम कोणत्या तऱ्हेने झाले यावर लक्ष देणे. नामासारखी गोडी नाही. नामाशिवाय मनुष्य जन्माची गोडी लागत नाही. आपले जीवन कोणत्या तऱ्हेने जात आहे, हे फक्त अखंड नामानेच लक्षात येते. म्हणून मुख्य नाम निर्माण झाले. नाम मनुष्य जीवन तारण्यासाठी आहे. नाम ही वस्तू नाही. आकार, रुप, रंग काहीं नाही. आपण जसे पाहू तसे दाखविले जाते. ज्या इच्छेने घेवू ती इच्छा पूरी करते.
नाम हे बीजारोपण आहे. शुद्ध भूमी सात्विक झाल्यानंतर त्याच ठिकाणीं टिकणारे नाम हे बीज आहे. नाम हे अनेक तऱ्हेचे आहे, अनेक मार्गात आहे, परंतु ज्यात मनुष्याचा उद्धार होतो, ते नाम लवकर मिळत नाही. ते नाम सहसा मिळत नाही. नामाची गोडी लागल्यानंतर सुटत नाही. ते नाम कोणते? त्याची गती काय? ते नाम कोठे आहे? याची ओळख, ज्या ठिकाणी प्रगट झाले, ते चराचर, परात्पर, क्षराक्षर सर्व व्यापून अलिप्त आहे. ©️