संताचे अभंग असे किर्तीरुप मागे राहतात. त्यांना भंग नाही. असताची किर्ती काही काळच मागे राहते, पण सताची किर्ती अभंग आहे. आतापर्यंत काही किर्तीरूप संतांनी विवरण केले आहे त्याला भंग आहे का? म्हणून अशा तऱ्हेने मानवाने जावे.
काही मानवांचे नाक मुरडणे काही गेलेले नाही. कारण त्यांना भक्तीचे मूळ सापडले नाही. ज्याच्या ठिकाणी द्वैत भक्ती आहे, त्याला भक्तीयुक्त ज्योत म्हणता येईल का? पण अद्वैताने गेल्यास त्याला कोणीही काहीही करणार नाही. असताला सत कृती पटणार नाही. तो आपल्याच तालाने जातो. म्हणून आपल्याला पाहिजे ते सत पाहिजे. त्या मार्गाने जाण्याचा सेवेकऱ्याने प्रयत्न करावा.
मी सर्व भूतेषु पश्य आहे. मी आकारी आहे आणि निराकारी पण आहे. मी सर्व ठिकाणी आहे. मी जर द्वैत नाही, तर जडत्वाने का द्वैत व्हावे? जे होते ते कोणाच्या सत्तेने होते? ज्याने ओळखले त्यानेच ओळखले. ज्याला ओळख पटली तो असत मार्गाने जाणार नाही.
ज्यावेळेला मानव अद्वैत भक्तीच्या ओघाने जाऊ लागला, त्यावेळेला त्याला कळले की, जगात एकच तत्व आहे. एकच, मानव जात आहे, पण ज्या वेळेला ईशाची ओळख होईल, त्याचवेळेला तो अद्वैत होईल. पण कोणी ओळख घेतली आहे का? ज्याला ओळख झाली, तो तरी अद्वैत आहे का? थोडा तरी मनात गढूळपणा येतो ना? मग तो का यावा? हीच मनाची छाननी पहावी लागते. पण मानवी सेवेकरी अजूनही डोळे उघडत नाही.
कोणत्या संतांनी सांगण्याचे काही बाकी ठेवले आहे का? ज्याला माहित नाही तो एक पोपटपंची, तर्कट ज्ञानाने भांडतो, म्हणून सेवेकर्यांनी त्या मार्गाचा अवलंब न करता, सत मार्गाने जाण्याचा राजमार्ग धरावा. जो सत मार्गाने गेला, त्याने मानवता धरावयास पाहिजे, म्हणून त्या मार्गाने वाटचाल करावी. सेवेकरी या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा धरावी का? समाप्त ©️