रामदासांचे उदाहरण घ्या. रामदासांना थंडी वाजून आली, त्याच वेळेला शिवाजी महाराज त्यांना भेटावयास आले. रामदास स्वामी आसन सोडून बाजूला झाले. दोघे भेटत असताना, फक्त ते आसन हलू लागले. कापू लागले. शिवाजीला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, “महाराज हे काय?” “हे प्रारब्ध आहे. आपण भेटायला आलात, आपले बोलणे, भाषण व्हावे म्हणून त्याला बाजूला ठेवले.”
त्यांना ते घालविण्याची ताकद होती. पण आज ना उद्या ते भोगावेच लागले असते म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने याची आठवण ठेवून सत् मार्गाने जात असताना जर अडचणी आल्या, प्रसंग आले तरी धैर्याने तोंड देऊन वाटचाल करा. प्रत्येक ज्योत प्रारब्ध घेऊनच आलेली असते.
हे आदल्या जन्मीचे संधान असते. त्याची काळजी करावयाची नाही. आसना सानिध्यात असणाऱ्या ज्योती भाग्यवान आहेत. सानिध्य मिळणे कठीण आहे. एक-एक, दोन-दोन तपे झाली, त्यांना मिळत नाही. पण तुमच्या प्रारब्धाने ते मिळते आहे. श्रीमंत सावकार व्हाल, सम्राट व्हाल, परंतु आसन व सद्गुरु सानिध्य हे मिळणे दुरापास्त आहे. हा अमूल्य ठेवा मिळाला त्याचा अह:र्निष उजाळा करून जतन करा. हीच महान इच्छा आहे. (समाप्त)