Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

पंढरपूर निवासी विठ्ठल – ©️

पंढरपूर निवासी विठ्ठल – ©️

       गुकार म्हणजे अज्ञान अंध:कार ! म्हणजेच ही प्रकृती – माया ! हिला ओलांडून जाण्यास मानवाला फारच यातायाती पडतात. 

       जोपर्यंत साकारात निमग्न नाही, तोपर्यंत मायेचा विसर पडत नाही. एकदा का तो गुकारात लंपट झाला, म्हणजे साकाराची जाणीव घेणे कठीण आहे. साकार उत्पन्न करावयाचे म्हणजे मी व्यक्ती आहे, असे मनात जाणून गेला, तर मात्र तो गुकाराच्या आज्ञेबाहेर जावू शकतो. नाही पेक्षा गुकारात लंपट झाला की, मी आहे असे वाटते. त्याला मी ची जाणीव होत नाही. मात्र साकाराची जाणीव कशी होते? साकारात गेल्यानंतर ब्रह्मनिधानाची जाणीव होते. त्याठिकाणी मायेचा लेश अगर लाघव नाही. जरी असले तरी काहीही चालत नाही. मात्र इथपर्यंत सेवेकरी हा जाणारा पाहिजे. तरच तो ब्रह्मानंदाच्या चरणाप्रत जावू शकतो. त्यालाच सत, सद्गुरु परब्रह्म म्हटले आहे. तेच सर्वत्र व्यापक असून, त्यालाच म्हटले आहे ज्योतीची निजज्योत ! त्याला रंग, रुप, आकार, विकार काहीही नाही. 

       जोपर्यंत मानव आकारात असतो, तोपर्यंत निराकाराची जाणीव नाही. मात्र जे निराकारी ते आकारी कसे होते याची जाणीव पूर्णांशी सत् सेवेकऱ्याला कळते. आकारी कसे? निराकारी कसे? याची जाणीव घेता येते. शिवाय हे ओळखता आले पाहिजे. पाहता पाहावत नाही अशी ती वस्तू आहे. नजर टिकत नाही, इतके ते अचल आहे. 

       अशा महान शक्तीस क्षणभर आपल्या दृष्टीने खडे करणे, पाहणे, साधे – सुधे नाही. अत्यंत कठीण! तसेच साधे आणि सुलभ आहे. 

       काही सेवेकरी अत्यंत शहाणे आहेत. वाचक आहेत. शास्त्राभ्यास करून बोलके पटाईत आहेत. काहीं सत् पुरुषांस आडवे लावणारे आहेत.  कुठे कसे आहेत दाखवा म्हणणारे आहेत. कारण वाचनाचा परिपाठ असतो. तोंडपाठ ओव्या झालेल्या असतात. बोलून पटदिशी मोकळे होतात. पाहणे शून्य ! 

       ज्यांनी पाहिले नाही, त्यांना अनुभव नाही. ज्यांनी पाहिले, जो अनुभवतो आहे, त्यांनी किती जरी सांगितले, तरी त्याला ते पटणे अशक्य! ज्यांनी पाहिले, अनुभवले, त्यानें असे शब्द ऐकले म्हणजे ते नाराज होतात. 

       ज्याला आकार नाही ते तुला कसे दाखवू? तुला कसे पटेल? जर त्याला सांगितले, की, तू स्वतः अनुभव घे, तर असे बोलल्यानंतर, नाक तोंड मुरडण्यास सुरुवात होते. 

       आम्हाला कार्यासाठीच पंढरीच्या ठिकाणी बसविले आहे. आम्हीं क्षिराब्धी असतो, तर क्षिराब्धींचे आसन खाली कसे? मग आम्हीं क्षिराब्धी कसे? 

       भगवान फार निराळे आहेत. सर्वत्र व्यापक असूनही अलिप्त आहेत. त्यांचा अंत कोणी लावलेला नाही आणि लावता येणार नाही. क्षिराब्धी सारख्यांचा तेथें पाड नाही, तेथें आम्हीं कोण? ज्याठिकाणी संत माझ्या नावाने टाहो फोडतात, त्यांना मी मार्ग दाखवितो.

       नामदेवाला गुरु करावयास सांगितले. त्याची आवश्यकता काय? जगद्व्यापक मालिक कसे आहेत ते पाहण्यासाठीच त्याला गुरू करण्यास सांगितले. 

       कितीतरी मानवांची आता गाभाऱ्यात गर्दी झाली आहे. काही भोळे भाबडे आहेत, काही आशेने आलेले आहेत. पाषाणाचे दर्शन मिळाले तरी बस झाले. काही शौकीन म्हणून आलेले आहेत. विठ्ठल कोठे आहे? हे पाहणारा फारच निराळा. क्वचितच असतो.

(समाप्त)©️

You cannot copy content of this page