मन स्थिर कसे राहील? जो सत्शिल, सतशुद्ध गतीने सद्गुरुंनी सांगितलेली चार तत्वे सांभाळून वाटचाल करेल, तर त्याचे मन स्थिर राहील.
हि चार तत्वे पुढीलप्रमाणे आहेत – (१) परधन आपले नव्हे (परधनाची अपेक्षा करु नये) (२) परस्त्री मातेसमान मानने (माता, भगिनी, भार्या) (३) मिथ्य (खोटे) बोलणे नाही (४) मादक पदार्थांचे सेवन व्यर्ज (अथवा व्यसन न करने) जी पाळली तर त्याच्या मनाला समर्थ हेलकावे घेऊ देणार नाहीत. म्हणून मन स्थिर ठेवण्यासाठी मनाची कृती सत्शिल पाहिजे. मनाची ठेवण सत् शुद्ध पाहिजे. लोक काहीही म्हणोत, त्याची पर्वा करावयाची नाही.
मन स्थिर हे सुख आणि मन अस्थिर हे दुःख आहे. तुम्ही जर सतपदाच्या आसनाचे सेवेकरी आहात तर तुम्हाला काय कमी आहे? मन स्थिर आणि अस्थिर का होते? मी मिळवतो हे सर्वांचे आहे. अंथरूण पाहून पाय पसरणे म्हणजे मन बेचैन होणार नाही.
मन बेचैन होणे म्हणजेच दुःख आहे. त्यामुळे शरीराचे नुकसान होते. नाना तऱ्हा निर्माण होतात. म्हणून संसार नीटनेटका करा. मिळाले म्हणून वारेमाप उधळू नका. हि सर्व मतलबी दुनिया आहे. फक्त सर्व मिळण्यापूरतेच आहे. मन अस्थिर होण्यास कनक आणि कांता हेच कारण आहे.
आपल्या गरजेला लागणारे, तेवढ्याच द्रव्याची आपणाला आवश्यकता असते, परंतु मानव तसे न वागता, आणखीन आणखीनच्या पाठीमागे लागून स्वत:वर प्रसंग ओढवून घेत असतो आणि गोत्यात येतो. सताने आपणास समाधानी वृत्ती ठेवण्याची शिकवण दिली असताना, आपण नाहक मायेच्या पाठीमागे धावून आपले समाधान आपणच हरवून बसतो आणि अति झाल्यावर सद्गुरु चरणांवर धाव घेऊन त्यातून सोडविण्यासाठी गयावया करीत असतो. हे यथायोग्य नाही.©️