Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

पडीले वळण … भाग दोन ! ©️

पडीले वळण … भाग दोन ! ©️

अघोर भक्तिने जातो, त्याला नमस्कार चमत्कार पाहायला मिळतात. तो सतापर्यंत येऊ शकत नाही. कारण इंद्रियाना वळण सत् पाहिजे. मग वागणूक कशी ठेवली पाहिजे? सत् भक्ताचे कर्तव्य कोणते आहे? घाबरू नका, उत्तर द्या. खेळीमेळीचे वातावरण आहे, तेव्हा निष्कारण वेळ घालविण्यापेक्षा अखंड तिजोरीत रममाण झाला, मग प्रकाश लांब आहे का? मग तुमची इंद्रिये इकडे तिकडे का बोकाळतात? तुमची इंद्रिये सतात निमग्न झाली नाहीत असे मी म्हणू कां? का अजून बाकी आहेत असे म्हणू? पूर्वीच्या संतांप्रमाणे जर ध्यानधारणा ठेवली तर प्रकाश लांब आहे का? कोणालाही अप्रकाशित ठेवलेले नाही. पण वाचाळता जास्त असली, तर प्रकाश कुठे आणि काय? ते सापडत नाही.

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली की त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले, ते सर्वांकरिता म्हटलेले आहे, नाही का? त्यांना ते दिसत होते, पण इतर ज्योतीना त्याचा अनुभव नव्हता. त्यांचा भाव निराळा नव्हता. तुकोबाला किती त्रास झाला? त्याने भोगले की नाही? मग असे का झाले? सेवेकऱ्यांनी विचार करावा. सर्वांची मते त्याप्रमाणे होती का? होय म्हणावे, तर त्यांना त्रास किती झाला? मग यातील मेख कोणी जाणली होती का? तुकोबांनी म्हणा किंवा इतर संतानी जाणली होती. पण दरबारच्या सेवेकऱ्यांनी जाणली होती का? सेवेकरी तंद्रित बसले तर त्यांना जाणता येईल की नाही?

समर्थ वाटेल ते करतील, ‌पण सेवेकरी कर्तव्यात निमग्न असेल तर समर्थांना वाव मिळेल का? तुमच्या हाताने तुम्ही तुमचे नुकसान करून घेता. वाचाळता, भंकसपणा, तुमच्या संगती येईल का? सेवेकर्‍यांनी जाणले म्हणावे तर असे का? गुरुबंधूत्वाचे नाते किती नाजूक आहे. पाठचा भाऊ हात वर करून संपत्तीचा वाटा मागावयास येतो. पण गुरुबंधू वाटा मागावयास येईल का? त्याच्या ठिकाणी किती प्रेम असते, तो डावलिल का? मग या ठिकाणी आपण कसे राहिले पाहिजे? तेव्हा गुरुबंधूत्वाचे नाते कसे आहे हे सेवेकऱ्याने ओळखून त्याप्रमाणे वाटचाल करणे. समत्वाने वागून आपल्या कर्तव्यात निमग्न राहणे. कृतीत उतरेल तेव्हा, तुकोबांच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येईल. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page