Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

आधी बीज एकले…..©️

आधी बीज एकले…..©️

श्री समर्थ मालिक –

“आधी बीज एकले | बीज अंकुरले | रोप वाढले ||””एका बीजापोटी, तरु कोटी कोटी | जन्म घेती सुमनें-फलें ||””व्यापुनि जगता तूंहि अनंता | बहुविध रूपें घेसी, घेसी परि अंती ब्रह्म एकले |”

आधी बीज, त्यानंतर फळ. फळात परत बीज निर्मिती. त्याचा मानव उपभोग घेतो. मूळात बीज कोठून निर्माण झाले? बीजाची पैदास कोठून झाली? त्याचा मानवाने शोध घेतला आहे का?

आधी बीज एकले…….. असे संताने म्हटले आहे. पण ते बीज कोठून आणि कसे निर्माण झाले? कोणी दिले? याची कल्पना मानवांना नाही. हा बीज देणारा जो आहे, त्याचा शोध लावल्यानंतर, कोणत्या गोष्टीची न्यूनता भासेल का? कमतरता येईल का? तर नाही. हे सत्य आहे ना? मग त्या बीज दात्याला हाताशी धरले किंवा त्याला आपलेसे करण्यासाठी काय करावयास पाहिजे? शुद्ध स्फटिका सारखा सेवेकरी होणे फार दुरापास्त आहे. टाकीचे घाव सोसून सोसून तो शुद्ध होतो. नाहीतर आले आमच्यावर आणि आले तुमच्यावर ! शुद्ध स्फटिका सारखा सेवेकरी असेल, तर तो असे उत्तर देणार नाही.

शुद्ध स्फटिका सारखा सेवेकरी याचा मनात विचार करून शोध घेत असतो. करीत असतो. हे कसे आहे? ज्याने आशा, मनीषा, तृष्णा, वासना, मी, तू हे सर्वस्व मारले आहे, तो सेवेकरी काय म्हणतो? चूक जरी नसली तरी माझी चूक आहे. मी चुकीस पात्र आहे. देईल ती शिक्षा भोगण्यास तयार असतो. भोगतो. सेवेकरी अगदी लिन म्हणजे मातीचा खडा जसा पाण्यात विरघळून जातो, त्याप्रमाणे सेवेकरी प्रणव टाकल्याबरोबर लिन होईल तर समर्थ शिक्षा देतील का? असा सेवेकरी असेल तर त्याने भक्तिचे वर्म जाणले असे होईल. 

सर्व ठिकाणी व्यापक, सर्व भूतेषु मी आहे, हे ज्याने ओळखले, जाणले तो सेवेकरी कसा असेल? माझ्याशी कोण बोलतो, तू त्याची विवंचना करील. जडत्व मानव बोलतो आहे का? कोण बोलतो आहे? सर्व व्यापक, सर्व भूतेषु मी आहे, हे जर जाणले तर त्या पात्रतेची उत्तरे तो देऊ शकतो. मातीचे ढेकूळ पाण्यात विरघळते. त्याप्रमाणे सेवेकरी पाण्यासारखा कधी होईल याची अपेक्षा मी करावी का? असा जर सेवेकरी बनला, मग मात्र तो बीज दाता निर्माण करणारा, बीजात बीज उत्पन्न करणारा कोण, त्याचा शोध घेईल. असे बीज निर्माण करणाऱ्याचा पाठलाग केला तर तो सापडेल. पण कसा सापडेल? माझे तुझे केल्यावर सापडेल का? सेवेकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. (पुढे सुरू…….२)©️

You cannot copy content of this page