Chinchpokli / मुख्य दरबार, लालबाग
१९४५ / ५० दरम्यानचा तो काळ होता. माऊली एका ठिकाणी स्थिर झालेली नव्हती. कधी वरळीच्या डोंगरावर, तर कधी घोडपदेवच्या गल्लीत, तर कधी बी डी डी चाळीत, तर कधी लालबागच्या बावलावाडीत अशी ज्ञानोपासना तथा समाज कार्याच्या निमित्ताने माऊलींची पदभ्रमना चालू होती.
आपल्या श्री सद्गुरू माऊलींनी चाळीतील एका खोलीतील बीजारोपनापासून आपल्या ह्या आध्यात्मिक कार्याचा शुभारंभ केला होता, तो चिंचपोकळी येथील बावलावाडीत स्थित वाघ नावाच्या भक्ताने आपली खोली माऊलींना आध्यात्मिक कार्यासाठी अर्पण केल्यानंतर. मग मात्र पाठीमागे वळून पाहण्याचा प्रसंग कधी आला नाही.
माऊली येथे स्थिर होवून, पुढील काळात सगळी कार्ये येथूनच करू लागली. म्हणूनच याचे नामाभिधान “मुख्य दरबार” असे करण्यात आले. या कार्यांमध्ये आध्यात्मिक प्रवचन, प्रबोधन, प्रसार तसेच सामाजिक कार्य, अडलेल्या नडलेल्यांना मानसिक, तर कधी कधी आर्थिक मदतीचाही हात पुढे करून अडचणीतून त्यांची मुक्तता करने यासारख्या कार्यांचा समावेश होता.
परंतू भक्ती हाच मुख्य उद्देश्य असल्याने त्याच्यावरच माऊलींचा प्रामुख्याने भर होता व त्यासाठी प्रवचनानी समस्तांचे प्रबोधन करीत करीत आज त्या रोपाचे रूपांतर वटवृक्षात कधी झाले हे कळलेच नाही आणि ह्या वटवृक्षाच्या फांद्या जगभरात जाऊन त्यांच्या सेवेकऱ्यांच्या रूपात पसरल्या.