मालिक – स्वधर्म हे निधान आहे. धर्म म्हणजे कोणता धर्म? धर्माच्या व्याख्या दोन आहेत – धर्म म्हणजे मानव धर्म !
(१) भिक्षुकाला धर्म म्हणजेच दान देणार, तोही धर्म आणि (२) सत् कृतीने मानवात जाणे तो ही धर्म !
पांडवांमध्ये धर्म होता, तो ही धर्म ! तो नावाचा धर्म होता. म्हणजे मग धर्म कोणता?
धर्म म्हणजे सत् धर्म, मानवधर्म याची तुलना एकाच चाकोरीतून जाते. मानव धर्मासारखा श्रेष्ठ धर्म नाही. मानव धर्म संचिताप्रमाणे मिळतो. म्हणजेच तो मानवात फेकला जातो किंवा चत्वार खाणीत फेकला जातो. चत्वार खाणीत फेकला, तर त्याला काही करता येणार नाही. त्याला बोलता येत नाही. तशाच आणखीही योनी आहेत. यात सत् गती मिळणे कठीण आहे.
मानव धर्मात सर्वस्व करता येते. सर्वस्व काही कळते. लोकांच्या मुखातून त्याला कळते की जगात ईश्वर आहे. ईश तत्व आहे. त्याप्रमाणे मानव वाटचाल करु लागला म्हणजे मानव धर्माप्रमाणे त्या परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करतो. मग, मानव धर्म श्रेष्ठ की चत्वार खाणी श्रेष्ठ?
धर्म दिक्षा हा धर्म नव्हे. मानव सत धर्माने गेला तरच धर्म ओळखला असे म्हणता येईल. मानव असून चत्वार खाणीप्रमाणे वागू लागला, तर त्याला मानव धर्म म्हणता येणार नाही. जगात मानव धर्म श्रेष्ठ. त्यातही हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. (समाप्त) ©️