Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

सेवेकरी चुकतो कां?-२-©️

सेवेकरी चुकतो कां?-२-©️

आता इतकेच, काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळली आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण कोणत्याही स्थितीत शोधा-शोध केली, तर आपणास कळेल की, हे अखंड नाम कोणत्याही ठिकाणी दिले जात नाही.

येथे सांगितले जाते, ते अनुभवातले सांगितले जाते. प्रत्यक्ष सहजासहजी विषय निघाला की त्याच्यावर प्रवचन सुरू होते. सत् सानिध्यात राहून, सतावर फार नितांत श्रद्धा असावी लागते, नाही पेक्षा जसे सेवेकरी तसे मला वागावे लागते. सेवेकरी नितांत, मी पण नितांत. सेवेकरी आत बाहेर, मग मलापण नाईलाजाने तसे वागावे लागते. अह:र्निश प्रापंचिक बाबी करता, काबाड कष्ट करता, एरवी ज्योतीसाठी खटाटोप करता, पण जड भारी झाले, तर कोण उपयोगी येते. प्रसंगाला कोण? तर फक्त सद्गुरु ! म्हणून आसनावरून जे सांगितले जाते त्यावर अढळ श्रद्धा ठेवून आपण वाटचाल कराल, तर पुष्कळ कमावले असे म्हणावे लागेल.

आपणाला प्रत्यक्ष अनुग्रहाचे दिवशी अनुभव दिला आहे. याप्रमाणे सेवेकऱ्याने पथ्ये पाळली, तर सांगणे हे आद्य कर्तव्य ठरते नाही का? प्रत्येक गोष्ट जो जो सेवेकरी करतो, चांगली म्हणा अगर चौकटीच्या बाहेरची म्हणा, प्रत्येक बाबीकडे लक्ष असते, पण संशय युग असल्यामुळे काही बाबतीत डोळेझाक करावी लागते. कारण मानव आहे. चालायचेच ! काही बाबतीत डोईजड वागू लागला तर मात्र लक्ष घालावे लागते. मग जय कोणाचा होतो? जो कमविल त्याचा उपभोग घेईल. जो कमावणार नाही, त्याच्या सारखा दुर्भागी तोच ! फक्त आज इतकेच सांगावयाचे आहे की सेवेकऱ्याने वाटचाल करताना डोळ्यासमोर सतत सद्गुरु मूर्ती ठेवून जे काय अखंड नाम बहाल केले आहे, त्याचा मुखात उजाळा करून वाटचाल केली तर कशी प्रचिती येते त्याची खूणगाट मनात बांधावी. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page