या दरबारातील सेवेकर्यांची प्रकृती वेगवेगळी आहे, पण अंत:र्यामी तत्व एकच आहे, याची गती मिळाली आहे ना? सेवेकरी सत दृष्टीने, आदर भावनेने चालले आहेत का? ’ग’ची पीडा निर्माण झाली की एकमेकाबद्दल तिरस्कार वाटतो. ही ‘ग’ ची पीडा नष्ट करण्याचा प्रयत्न करा.
पाठचा बंधू एखादे वेळेस संपत्तीसाठी तुमच्याविरुद्ध वागेल. तो वाटा घेणारच! इतकेच काय तो तुमचा घात करण्यास कमी करणार नाही, पण एकाच तत्वाचे सेवेकरी हे गुरुबंधू आहेत. हा गुरुबंधू तुमच्या संपत्तीची आशा करील? घात करण्याचा प्रयत्न करील? तर नाही. तो तुम्हाला आदरच देईल. हे प्रेम अखंड टिकवण्याचा प्रयत्न करा. हे टिकवले तर वाद होणार नाहीत. याची खूण एकच, तुमच्या गुरुबंधूला कोणीतरी टिचकी मारीत आहे, हे ओळखून तरी गप्प बसावयास पाहिजे. गप्प बसल्यानंतर समतेचे वातावरण निर्माण होईल.
बाबांना जरी सांगितले तरी ते सेवेकऱ्यांची समजूत घालतात. एकापासून अनेक निर्माण होतात हे सेवेकर्यांना माहीत आहे. इतर मानवांचा प्रश्न सोडून द्या. येथील सेवेकऱ्यांना ही गती आहे की नाही? (पुढे सुरु…३)©️