बाबा – सत् कर्तव्यापासून दूर कोण नेत असेल तर ते एकच, धन ! धन जर मानवाजवळ असले, तर त्याला मान मरातब मिळतो. त्याची प्रसिद्धी होते. त्याला सर्वस्व चाहतात. सर्व लोक मान देतात. रामदास स्वामींनी म्हटलेले आहे, “मरावे परि किर्ती रुपे उरावे !” त्यांनी किर्ती मिळवली. ते आपल्यामध्ये अजून ताजे आहेत. त्यांनी जी किर्ती मिळविली, नाव कमावले, ते पैशाने कमाविले नाही. तेव्हा आपणाला सत गतीने जावयाचे आहे. सताच्या ठिकाणी आपणाला स्थिर व्हावयाचे आहे.
जे संत महात्मे होऊन गेले ते प्रसिद्धी परायण होते का? तर नाही. चंद्रमौळी त्यांचे घर होते. असे असताना त्यांची किर्ती मागे कां राहिली? संतही धनाचे लोभी नव्हते. पण आपले सेवेकरी बघा. ते येतात आणि म्हणतात, “बाबा, पूरत नाही. पण संत तसे होते कां? संत चिडतात, पण सत् प्रेमाने, आपुलकीने चिडतात. ते म्हणतात, “तू जर असा आहेस, तर मग आमची दैना कां?” त्यांच्या जवळ धन नव्हते. त्यांनी व्यक्त धनाची कधी आशा धरली नाही.
समर्थांनी सांगितले आहे, ७५ टक्के असत व २५ टक्के सत आहे. त्याचप्रमाणे १२ आणे धनाचे लोभी आहेत आणि ४ आणे अव्यक्त धनाचे लोभी आहेत. ते नि:स्वार्थी आहेत. सत् मार्गाने कष्टाने मिळेल तेच घ्यावे आणि अशाप्रकारे घेतले तरच त्यात समाधान आहे.
व्यक्त धनाशिवाय मानवाचा व्यापार चालणार नाही हे मला मान्य आहे. पण मनाची धारणा नि:ष्काम पाहिजे. मिळेल त्यातच मनाची ठेवण उच्च पातळीची ठेवली पाहिजे. हाय हाय नको. जेवण जरी जेवायचे तरी समर्थांना अर्पण करून जेवतो. तो सांगतो, मी निमित्त मात्र आहे. मी फक्त कुटुंबाची देखरेख करतो. अशा तऱ्हेने व्यक्त धनाचे महत्व आहे. त्याला कधीही अपुरे पडणार नाही. त्याला अन्नपूर्णा वरून काही देत नाही. जे कष्टाचे आहे, त्यातच भागून पूरून उरते. (पुढे सुरू……२)©️