आजचा महान दिवस आहे. किती मानव त्या ठिकाणी तल्लीन झाला आहे ! पण कोणी शोध घेतला आहे का? तो आपल्या कृतीने रममाण झाला आहे, पण कोणी शोध घेतला आहे का? कोणीही बोट दाखविणार नाहीत की, या ठिकाणी विठ्ठल हे तत्त्व आहे. असे ओळखणारे फार थोडे आहेत, पण शक्ती नाही. शक्ती आहे पण भक्ती नाही, श्रद्धा नाही. ज्याचे ठिकाणी ठाम श्रद्धा आहे, तो पांडुरंगाला ओळखणार नाही का? पण मानव टाळ आणि मृदुंग यात तल्लीन झाला आहे. हे कशासाठी? ज्याच्यासाठी तो या ठिकाणी आला, त्याला डोळे भरून पाहण्याची शक्ती आहे का?
मानवांना जवळ घेण्यासाठी पुष्कळ प्रयत्न झाले आहेत. साधू, संत, सद्गुरु पद निर्माण केली आहेत, पण मानव मनाचे चाकोरीतून दूर जातो, म्हणून सद्गुरूस पाहू शकत नाही आणि ती ही फार मोठी मेख आहे. ज्याने हे ओळखले, त्याला हे दूर नाही.
या महाराष्ट्र भूमीत अनंत कालापासून कार्य करीत आहेत, ज्यांची जशी भावना, श्रद्धा, त्याप्रमाणे त्याला गती देतात. मायावी जातीची असेल, तर त्याला तेवढेच देतात.
माया आहे, मायेच्या कक्षेत आपण आहोत. माया कोणालाही सुटलेली नाही. जसे चिखल आणि पाणी, तशी स्थिती आहे. मायेत गुरफटायचे नाही. माया मायेच्या स्वरूपात कार्य करते. आपण आपल्या कर्तव्याप्रमाणे कार्य करावयाचे. आपणाला सद्गुरूंनी जे नामाभिधान दिले, त्यात तल्लीन व्हा. मायेला सोडा असे ते कधीही सांगणार नाहीत, पण मायेच्या स्वरूपाचे आत, मायेच्या अलग जे आहे, त्याच्या ठिकाणी तल्लीन व्हा.
मी महाराष्ट्राचे कर्तव्याला बांधील आहे. मलाही या कर्तव्याची जाणीव आहे. बाबा – तुम्ही गाभाऱ्यात नसता, मग हे कसे त्या ठिकाणी जातात?
विठ्ठल – आंधळ्याशी जग, सारेची आंधळे ! कारण त्याला काठी नाही. ती असेल, तर तो वाटचाल करील. तो सेवेकरी माझे ठायी पूर्णत्वाने रममाण होतो, त्याचे दास्यत्व करण्याचीही माझी तयारी असते, पण सेवेकरी त्या पायरीचा पाहिजे.©️