हे कलियुग आहे. हा कलीचा महिमा आहे, त्यामुळे मानवांची मने क्षणाक्षणाला पालटतात. सत्याची चाकोरी मानवाला अनुसरावी वाटते, पण मनाची द्विधा स्थिती असली की, तो चाकोरीच्या बाहेर जातो.
परमनिधान तत्वाने मानवांची मानवता सिद्ध करण्यासाठी अनेक तत्त्वे निर्माण केली आहेत. ही कशासाठी? तर मानव देह श्रेष्ठ आहे. मानव देहात जे करायचे, ते सताचा शोध घेण्यासाठी, ते स्वतःचे बुद्धीने तयार करायचे असते. अनेक मार्गानी शुद्धता आणावयाची असते.
अशासाठी मालकांनी अनेक तत्त्वे निर्माण केली. ती मानवांना राजमार्गावर आणण्यासाठी निर्माण केली. त्या मालकांना डोळे भरून पहा. यासाठी महान सेवेकरी निर्माण केले. त्यांना कामगिरी दिली. त्या जोरावर मानवांना स्थिर करण्याचे प्रयत्न केले. आमच्यासारखी महान तत्वे भूतलावर पाठवली आहेत.
मानव हा इशाचा अंश आहे. सर्वस्व त्याला दिलेले आहे. दोन्ही गाठोडी त्याच्याबरोबर आहेत. त्याच्यात जशी सतशुद्धता असेल, त्याप्रमाणे त्याची बुद्धी प्रगल्भ होते. ज्या तऱ्हेची प्रगल्भता, त्याप्रमाणे त्याला वेष्टण पडते. (पुढे सुरु….२)©️