मानवाची अशी इच्छा आहे की आम्हीं शरण आहोत.
कशाकरीता शरण आहोत? कोणाला शरण आहोत?
कोणाला ईश्र्वर पहाण्याची इच्छा असते, तर कोणाला धनसंपदा मिळविण्याची इच्छा असते, कोणाला संपत्ती मिळविण्याचा उद्देश असतो, अशी प्रत्येकाचीच इच्छा वेगवेगळी असते.
कोण म्हणतं मला मुल पाहिजे, कोण म्हणतं, देवा मला सुखी ठेवा, तर कुणाची इच्छा असते मला संपत्ती पाहिजे, तर कुणी म्हणतं मी आरामशीर बसून खावे. पण यांच्यातून जो निष्काम भक्ती करील, तो मात्र आपल्या आयुष्याचं कोट कल्याण करुन घेईल.
ईश्वर कोठे आहे?
कित्येकांच्या मनाचा भ्रम असा होतो की, आम्हीं शरण आहोत, गुरू व आम्ही सारखे आहोत. त्यांना ईश्वर कसे म्हणू? त्यांना ईश्वर म्हणता येत नाही. ते ईश्वर नाहीत.
म्हणूनच म्हटले आहे की, त्या ठिकाणची ओळख नाही, तर ईश्वर कसा बरे सापडेल? मग शरण येऊन काय उपयोग? तुम्ही कोणाला शरण आलात? याच्यात अर्थ नाही. म्हणूनच कित्येकांना गुरू हे काय आहेत, याची जाणीव नाही आणि जर का जाणीव असती, तर लोक संशयात गुरफटले नसते आणि हजारो रस्त्यांनी फिरले नसते. ©️