Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

मुक्त होता परी बळें – भाग (२) ©️

मुक्त होता परी बळें – भाग (२) ©️

जन्माला फेकल्यानंतर तो भक्त कसा असतो? कर्माच्या शाखा दोन – सत् आणि असत ! मग असत मार्गाने गेल्यानंतर तो पूर्ण बद्ध झाला. मग तो जन्माला आला काय आणि नाही काय सारखाच ! समर्थ आपल्या ऋणातून मुक्त होतात. त्याला, मानव जन्म देतात. मग पुढे तो मायेच्या आधीन बनून असत मार्गाने जातो. मग, करतो ते मीच करतो असे तो बरळत सुटतो. अशा तऱ्हेने त्याचा आवाज बद्ध निघतो. त्यामुळे तो सर्व विसरून जातो. त्याला जगात दिसते, तेच प्यारे वाटू लागते. त्यामुळे तो सत मार्गाने जाऊ शकत नाही. पूर्व जन्मीच्या रंगढंगा प्रमाणे जातो. त्यामुळे त्याला सत् सानिध्य सापडत नाही.

काही संतांनी म्हटले आहे, झनी दृष्टी लागो सगुणपणा, जेणे माझ्या मना बोध केला. मग त्यांनी ध्यान दृष्टी कशावर लावली होती? तर सगुणावर ! सगुणा पासून त्यांना शांती मिळाली म्हणजे व्यक्तीपासून, जडत्वापासून जडत्वाला शांती मिळते. मग ज्या सगुणापासून सगुणाला शांती मिळते, ते सगुण कोणते असेल? म्हणून त्यांच्याजवळ काहीतरी अधिकार आहेत, म्हणून ते शांती देऊ शकतात. तोच सगुण पाहता पाहता दृष्टीआड होतो. मग ज्ञान दृष्टी प्रगट होते. तदनंतर निर्गुण आपोआप प्रगट होते. आकार असून आकार रहित होते. मग तोच आकार, स्थूल सोडून सूक्ष्म बनतो. नंतर कारण, नंतर महाकारण ! अशा तऱ्हेने त्याच्याही पलीकडे आपण गेला असाल. काही का असेना, आकारी पाहिल्याशिवाय सगुणाची शांती होत नाही.

संतांनी सांगितले आहे, मसुरा समान मोतीयाचे परी ! असे दर्शवे द्वारी ! ते आहे म्हणून सेवेकरी रममाण होतो. हे सर्व ठिकाणी आहे. कोठेही रिता ठाव नाही, मिळणार नाही. कोण त्या जातीचा असेल त्याला इतरांना नाही. म्हणून मुक्त होण्यासाठी मानव जन्म आहे. तो पवित्र आणि श्रेष्ठ आहे. धारणा झाली की तो मुक्तच आहे. बाहेर पडल्यानंतर तो मुक्तच आहे. पण पुढे मायेत गुरफटून तो बद्ध होतो. म्हणून ही ओवी छान आहे. त्याप्रमाणे वाटचाल करणे हे संदेश आहेत. पाप पुण्य कशापासून निर्माण होते? एका सेवेकऱ्याने म्हटले आहे, मालिक तुम्हीच सर्व करता, दुसरे कोणीही नाही. अशा सेवेकऱ्याला काय म्हणावे? हे कळत नाही. मी जर सर्वस्व करतो, तर त्याचे प्राय:श्चित्त मला झाले पाहिजे. मग सेवेकरी का भोगतो? यावर पूर्ण विचार करून, त्याप्रमाणे वाटचाल करणे हे संदेश आहेत. (२) समाप्त ©️

You cannot copy content of this page