Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

मुक्ती पेक्षा भक्ती श्रेष्ठ – ©️

मुक्ती पेक्षा भक्ती श्रेष्ठ – ©️

मुक्ती पेक्षा भक्ती श्रेष्ठ – जोपर्यंत स्वयंप्रकाशात सद्गुरु दर्शन मिळत नाही, तोपर्यंत मोक्ष नाही. स्वयंप्रकाशात सद्गुरु दर्शन मिळणे हीच मुक्ती आणि हाच मोक्ष आहे.

प्रथम भक्ती श्रेष्ठ ! त्यात त्याला मुक्ती मोक्षाची गती नाही. सूक्ष्माची गती सद्गुरु देतात. मग तो सूक्ष्मात तल्लीन होतो. त्याचे सूक्ष्म त्याला दिसते. त्याच्यात रममाण झाल्यानंतर – कारण, महाकारण येथपर्यंत गती असते. अणू, परमाणूत गेल्यानंतर त्याला काही कळेल का? स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण याचा विसर पडल्यानंतर पुढे त्याची गती आहे की नाही हे त्याला कळत नाही. मग अणू, रेणू परमाणू त्याला काय कळणार? सद्गुरु महाकारणापर्यंत गती दाखवितात. पुढे जरी त्याला नेले, तरी त्याला ते समजणार नाही.

सर्वस्वाचा विसर पडल्यानंतर, सद्गुरूंच्या ठायी तल्लीन झाल्यानंतर, त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात. त्यालाच सच्चिदानंद असे म्हणतात.

जडत्व शाश्वत अन् अशाश्वत या दोन्हींवर अवलंबून आहे. शाश्वताकडून अशाश्वत कर्तव्य करून घेते. म्हणून शाश्वताला महत्व आहे. शाश्वत आहे त्याने केव्हा उपदेश केला आहे का? म्हणजे आकार आणि निराकार ! आकाराकडूनच सर्वस्व करून घेतले जाते. निर्विकाराकडून उत्तरे मिळतात. पण कधी? निर्विकाराने किती जरी सांगितले, तरी ऐकणार नाही. पण आकाराने सांगितल्यानंतरच तो गतिमान होतो. म्हणून शाश्वत आणि अशाश्वत दोघांचाही नाश होत नाही.

इतकेच आहे, हे जड आहे, दृश्य आहे. ते अदृश्य होते. पंचमहाभूतांचा हा पुतळा आहे. पाचही तत्वे याच्यात मिश्रण होतात. मग शाश्वत की अशाश्वत कोणी पाहिले आहे का? नाश जर पावले तर सूक्ष्म कसे निर्माण होते? मग पुन्हा जन्माला येतो कसा? म्हणून सेवेकऱ्यांनी भक्तीच्याच मार्गाने जाणे. महान संतांनी देखील हेच सांगितले आहे.

मी भक्तीचा भुकेला आहे. मला भक्तीनेच ओळखता येते. भक्तीनेच भक्त माझ्याजवळ येऊ शकतात. प्रथम भक्त असेल, तदनंतर मुक्ती आणि मोक्ष पुढे ! मी भक्तीचाच भुकेला आहे. म्हणून मुक्ती पेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. (समाप्त)

You cannot copy content of this page