श्री समर्थ मालिक – श्रीकृष्ण जयंती – या ठिकाणी ज्ञानच भरलेले आहे, परंतु घेणारा पाहिजे. ज्ञान साधे, सोपे, सुलभ तितकेच ते कठीणही आहे. कठीण कोणाला अन् सुलभ कोणाला? करील त्याला सोपे आहे, न करील त्याला कठीण आहे.
मी ज्यावेळी प्रत्यक्षात अवतार कार्य नटविले, ते कोणत्या कारणाने घेतले? त्यावेळी सेवेकरी, मानव प्राण्यांना भयंकर त्रास होता, तिच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यावेळी एकच त्रास देणारा प्राणी होता, पण आता ज्याच्या मनाला येईल तो राजा ! अशी परिस्थिती आहे. सगळा मनाचा कारभार चाललेला आहे. अशी परिस्थिती का होते? सांगतो.
पृथ्वीवर जास्त भार झालेला आहे, हे मी जाणतो. दुसरी गोष्ट सत् भक्तीची स्थिती सत् होते का असत होते हे मी जाणतो. थोड्याच अवधीत जे घडवून घ्यावयाचे ते घडवून घेणार आहे. याच्यात अघोरांना खो घातल्याशिवाय, अघोरांना चवतावळल्या शिवाय त्यांचा नाश होणार नाही. यासाठी युक्ती प्रयुक्ती करावयास पाहिजे अन् तीच कारवाई आता सुरू आहे.
आपले व सेवेकऱ्यांचे प्रणव माझ्या कानी येतात किंवा सेवेकरी व आपले बोलणे चालते. एकमेकांची खूण एकमेकांना कळते. ज्याला गती नाही, त्याला कळणार नाही. आता अहंकार मातलेला आहे. या अहंकाराचा लवकरात लवकर कार्यभाग उरकण्यात येईल. महाराष्ट्र भूमी शापातून मुक्त करावयाची आहे. ही घुसळन झाल्याशिवाय भूमी शुद्ध होणार नाही. ही घुसळन करणारच. (पुढे सुर…२)©️