पांडवां सारखे जीव:श्च कंठ:श्च दुसरे कोणी नव्हते. त्यांच्यासारख्यांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झळ लागली. ती त्यांनी सहन केली. त्यानंतर कौरवांचा नाश करण्यात आला. हे का? कौरव पांडव हे नातलगतच होते. कौरवांची बुद्धी सात्विक का झाली नाही? का होऊ शकली नाही? ज्यांची कृती सात्विक असेल तरच ते सात्विक होतील.
कौरवांची भावना शुद्ध नव्हती म्हणून वृत्ती पालट झाली नाही. अहंकाराने बरबटलेल्या त्या ज्योती होत्या. त्यांना वाटत होते की आम्ही कोणीतरी विशेष आहोत. त्यांना माझी गती का मिळू नये? कारण कि ती पात्रता कौरवांजवळ नव्हती. त्यांचे वाद समत्व बुद्धीने मिटले असते, तर मला मध्ये पडावे लागले नसते. पण पांडवाना काही द्यावयाचे नाही असे त्यांनी ठरविले होते.
सत भक्तीने चाललेले असताना त्यांना काहीच द्यावयाचे नाही, असे त्यांनी म्हटल्यानंतर मी पांडवांची बाजू उचलून धरली, पण भक्त त्या पात्रतेचे पाहिजेत. पृथ्वी सर्वस्व धगधगली आहे. तिच्या डोईवरचा भार कमी केलाच पाहिजे अन् तो करावयासच हवा. काळ जवळ जवळ येत आहे. ही गदा कोणावर फिरणार, हे मला आत्ताच सांगता येणार नाही आणि काही सांगण्याची आवश्यकताही नाही. (समाप्त)