श्री समर्थ मालिक–पडीले वळण इंद्रिया सकळा ! भाव तो निराळा नाही दूजा !!
इंद्रियाना वळण कसे आणि कोणत्या रितीचे आणि कोणत्या रितीचे नाही हा प्रश्न आहे. जी ज्योत भक्तित, सद्गुरु चरणात लिन झाली असेल, त्याच्या इंद्रियाचे वळण कसे असते म्हणून त्यांनी सांगितले? पडीले वळण इंद्रिया सकळा ! त्याला जिकडे पहावे तिकडे सतच सत् विखुरलेले दिसत होते. त्याची इंद्रियें सद्गुरुमय झालेली होती. त्याचा भाव निराळा नाही. त्या संताने असे म्हटले, त्याप्रमाणे खरे होते की नाही? त्याचे रोम रोम सर्वस्व सतमय झाले होते.
या पृथ्वीतलावर प्रकृती किती आहेत? व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. पण प्रकृती अभिन्न होईल तर एकच वळण लागेल. तुकोबाच्या म्हणण्याप्रमाणे मग सोपे आहे की नाही? प्रकृतीच्या वळणाप्रमाणे हरएक मानव जातो. प्रत्येकाचे वळण निरनिराळे असते. कोणी असत मार्गी जातो, त्याच्या इंद्रियांना असत वळण लागते. जशी ज्याची मनोभावना, तशी गती मिळते. जो खरोखर यात रममाण झाला, त्याच्यात आणि असत भक्तिच्या मानवात जमीन अस्मानाचा फरक असतो. सत भक्तीने जाणारा माझ्याप्रत येतो आणि असत भक्तीने जाणारा माझ्याप्रत येत नाही. खरे की नाही? म्हणून असत भक्तिने जाणारा कदापिही माझ्याजवळ येणार नाही.
पडीले वळण…. यांनी असे का म्हटले? स्वतःच्या वरून सांगितले की इतरांवरून सांगितले? त्यांनी तो स्वतःचा अनुभव सांगितला. जो भक्तित रममाण झाला, त्याला लबाड, दुश्मन, चांडाळ दिसत नाही. पापपुण्य समजत नाही. तो एकातच रममाण झालेला असतो. म्हणून म्हटले, ”पडीले वळण इंद्रिया सकळा” ! पण ते कधी आणि केव्हा? ते संत, रात्रंदिवस सद्गुरु ध्यानात निमग्न झाले होते. प्रकृतीचा तरी अंत लागलेला आहे का? प्रकृतीत कोण वास करतो, हे कोणी पाहिले आहे का? (पुढे सुरु…..२)©️