आपल्या दरबारची चार तत्वे आहेत. त्यांचे पालन करा. जो बोल काढला, त्या बोलाला महत्व आहे, तो सत् करा. जी कृती हाती घेतली, ती पूरी करा. ते न करता, सेवेकरी दुसरेच करतो.
जे गुरू, ज्यांचा शिरी हस्त पडला, त्यांनी मार्ग दाखविला, त्यांची ओळख ठेवणे, त्यांना पाहणे कठीण तितकेच सोपे देखील आहे. पण कसे? त्या मार्गाने गेलात तर !
प्रथम शुध्दता पाहिजे. शुद्ध पाहिजे तो कसा? आंघोळीने नाही. त्यानें फक्त बाहेरचा मळ साफ होईल. आतला काळेपणा तो साफ कसा होईल? त्याला काय केले पाहिजे? त्याला एकच साधन, ते म्हणजे अखण्ड नाम ! त्या नामात राहशील तर मन साफ होईल. असे जर नसेल, या प्रमाणे सेवेकरी जर वागत नसेल, तर आपल्या कृतीनेच असत संचित घडवीत असतो. हरीच्या कृपेने सावरत असतात. जर सत कृतीने गेल्यास, हरीच्या कृपेने असत संचिताचा नाश होईल.
आपल्या सेवेकऱ्यास सदगुरू पदानेच मान मिळाला पाहिजे. कोणी प्रश्न विचारले, तर उत्तरे देता आली पाहिजेत. म्हणजे आपल्या सताचा पाया भक्कम असेल, तर ठामपणे उत्तर द्याल. मालिक छायेप्रमाणे मागे असतात. मालिक सांगताना पुष्कळ सांगतात, पण सेवेकरी आपल्या हाताने करून घेतात. मालिक काहीच करीत नाहीत. पुढे सुरु……३ ©️