अलख – नामस्मरण त्या वृत्तीचे, त्या पदाचे केल्यास, तो मार्ग आपणास मिळेल. त्यासाठी जागे झाले पाहिजे. दोन मिनीटे का होईना, सर्वस्वाचा विसर पडून, तन्मय व्हावयास पाहिजे. सेवेकरी जरी थोडे चुकले, तरी मालिक त्याला फांसावर चढवणार नाहीत. पण हे का चुकले त्याचा त्यांनी विचार करावा. शेवट शेवट हे घ्यावे लागते, म्हणजेच सेवेकरी सुधारतो. म्हणून सेवेकऱ्याने सुधारावे. जर हे शब्द वारंवार कानावर पडले, नेहमी घुमत राहिले, तर सेवेकरी सुधारतो. पडले नाहीत तर सुधारणार नाहीत.
मालकांना सर्वस्वाची जाणीव आहे. कोणत्या तऱ्हेने, कोणत्या गतीने कार्य केले म्हणजे, ते पार पडेल?
आता १९६१ साल सुरू झालेले आहे. जे बोल निघाले, ती कृती होणार आहे. त्याच्यासाठी कोणत्या रितीने वागावे, सांगण्यात येणार आहे. आपले सेवेकरी मोठे असले तरी, लहानच आहेत, असेच म्हणावे लागते. मायावी युगांत आपण मोठेच आहोत. कोणत्या ठिकाणी शांती हवी, कोणत्या ठिकाणीं त्याच तऱ्हेची उत्तरे द्यावीत हे लक्षात ठेवा. खोटे बोलावयाचे नाही. तो एवढेच म्हणेल, त्यात वाईट नाही. जो प्रश्न विचारला, त्याप्रमाणे उत्तरे द्या. त्या ज्योतीला मोठेपणा कोणत्या ठिकाणीं? ज्या दरबारात येता, त्याठिकाणी नम्रता ठेवा. त्या ठिकाणी उर्मटपणा दाखविला गेला, तर ते नामस्मरण, भक्ती सर्वस्व काढून घेतले जाते. सेवेकऱ्याने त्या तऱ्हेने वागा, वाटचाल करा. ©️