श्री विठ्ठल – या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला आहे. लिनता, नम्रता, शांती आहे. “देही देखीली पंढरी | आत्मा अविनाश विटेवरी ||” असे एका संताने म्हटले आहे. त्याने प्रत्यक्षातही अनुभवले आहे.
ज्या ठिकाणी शांती आहे, तेथे तत्त्व असणारच. जेथे तत्त्व आहे, तेथे शांती आहे. शांती हीच रुक्मिणी आहे. याच्यापेक्षा महान शक्ती आहे तिला महामाया म्हणतात. आदिशक्ती म्हणतात. अन् सर्व व्यापून सुद्धा अलिप्त आहे, असा तिचा व्यवहार चालतो. ती शक्ती करूनही अलिप्त आहे. ती शक्ती आमच्याकडून कर्तव्य करून घेते.
ही सृष्टीची रचना आमच्या हाती जरी असली, तरी संदेश सुटल्याशिवाय कृती होत नाही. आदेश सुटतात. त्याची तत्त्वाला जाणीव असते. जोपर्यंत आदेश सुटत नाहीत, तोपर्यंत काही एक करता येत नाही. सर्वस्व त्यांच्या आदेशाप्रमाणे कार्य होते.
असे ते सर्वस्वांचे प्रमुख त्यांना पाहता येत नाही. वर्णन करता येत नाही. हे त्रिभुवन सर्वस्व सतमय आहे. सताने भरले आहे. परंतु प्रकृती भिन्न असल्या कारणाने ओळख नाही. तत्व सर्व ठिकाणी एकच आहे. पण ज्याने गती घेतली, अनुभव घेतला त्याला सर्व ठिकाणी मी तू एकच आहे असा अनुभव येतो. असताला अनुभव नाही. सत् हे सर्व ठिकाणी भरले आहे. त्यांच्याच आदेशाप्रमाणे आम्ही कार्य प्रवीण असतो. ते सर्वस्वाचे निधान आहेत. आपण सर्वस्व सेवेकरी आहोत. (समाप्त) ©️