Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

आपले सद्गुरु ….कपिल मुनी ©️

आपले सद्गुरु ….कपिल मुनी ©️

आपले सद्गुरू कसे आहेत, ते कोणत्या रितीने सांगत आहेत, त्याचा अंत घेणे. या कुडीतून अविनाशी आत्मा बाहेर पडेपर्यंत त्यांना एकदा तरी डोळे भरून पाहणे. ज्यांनी पाहिले, अंत घेतला, तोच भाग्यवान होय.

अंत घेणे जितके कठीण, तितकेच ते सोपे आहे. आपला सेवेकरी वाममार्गी गेला, तरी सद्गुरु त्याच्यासाठी किती प्रयत्न करतात की, तू असा चल ! या मार्गाने जा ! जर गेला नाहीस तर यांच्यात जे सत आहे, ते तूला मिळणार नाही.

कसलीही जाणीव न ठेवता, आपल्या ध्यानात, नामांत दंग व्हावयास पाहिजे आणि याच तऱ्हेने लय व्हावयास पाहिजे. अशा ज्योतींना मालिक दूर लोटणार नाहीत. प्रत्येकाने या मार्गाने जाणे. आपली चूक कबूल करणे.

मी सुद्धा सात वर्षांचा होतो, त्यावेळी जे सत् संस्कार झाले, तेच शेवटपर्यंत टिकले. या आनंदातच मी याठिकाणी आलो. हे माझे सर्वस्व ! हेच माझे माहेर घर आहे. याठिकाणी आल्यानंतर जो आनंद होतो, जी आनंदाची लुट मिळते, ती इतरत्र कुठेही नाही. सद्गुरू शिवाय कोणीही तारक नाहीत. त्यांच्या आज्ञेत राहणे. त्याप्रमाणे कृती करणे, हे प्रत्येक सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे. सेवेकरी मालकांचा आहे. त्या आज्ञेची, आदेशाची किंमत न ठेवणे, ही महान चूक आहे. तिला क्षमा कशी मिळेल? तेव्हा सद्गुरू नामात दंग होणे. प्रकाशात गुंग असणे, हाच खरा आनंद होय. (समाप्त)

You cannot copy content of this page