Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

आधी बीज एकले – भाग दोन ©️

आधी बीज एकले – भाग दोन ©️

एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे, हे जर ओळखले, तर कोणते प्रणव निघतील? कोण बोलतो आहे, याचा विचार केला, तर त्या ठिकाणी कसे वागावे त्याची खूणगाठ बांधावी, तरच बीज दाता हाताशी सापडेल. त्याची ओळख होईल. ओळख झाली नसती तर या ठिकाणी रममाण झाला नसता. ओळखून सुद्धा पळवाट काढली तर त्याचा अनुभव आपल्याला अवश्य मिळेल. अनुभव असून, ओळख असून पळवाट काढली तर दोष कोणाचा? म्हणून पळवाट काढू नका. सेवेकऱ्याच्या, भक्ताच्या अंगी लिनता असली आणि जो खरोखरीच लीन आहे, त्याला तहान, भूख, मान, अपमान काही नाही, असा सेवेकरी झाला, मग मात्र त्याला मी जवळच आहे. मग, बीज दाता कोण आहे, हे त्याच्या हाती बरोबर मिळेल. असा जर बीज दाता सापडला तर उपरी बीजाचा उपयोग होईल का? अशी बीजे निर्माण झालेली, जातात किती, येतात किती, पैदास होतात किती आणि लय होतात किती? म्हणूनच आपण एक समर्थांचा कण आहोत असे समजून चालावे. याची खूणगाठ तुम्हाला मिळणार नाही. पण मानव जन्म हक्काने मिळेल. यासाठी सत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. हे संदेश आहेत.

एका बीजापासून किती उत्पत्ती होते हे तुमच्या नजरेसमोर आहे. मुळात बीज कोठून आले आहे, कोणी फेकले आहे, याची माहिती मिळाली आहे का? मग, बीज दाता किती लांब आहे, किती अंतरावर आहे? बीजात मीच आहे. स्थुल, सूक्ष्म, कारण, महाकारणातही मीच आहे. चेतनात, अचेतनात देखील मीच आहे. मला आदी, अंत, मध्य काहीही नाही. त्या पात्रतेचा भक्त असेल तर मला कोठेही पाहू शकतो. भक्त हा सत शुद्ध पाहिजे नाही का? मग गप्पा मारून, टिंगल टवाळी करून, खवचट बोलून, अशाने मी मिळेन का?

गुरुबंधूचे नाते फार कोवळे आणि नाजूक आहे. हे एकाच मालकांचे कुटुंब आहे. एकाच पित्याची लेकरे आहेत. अशा तऱ्हेने वर्तणूक ठेवलीच पाहिजे. एका मातेच्या लेकराप्रमाणे वर्तणूक ठेवली पाहिजे. गुरुबंधूचे नाते असे आहे की, जो आपणाजवळ काहीही मागणार नाही. फक्त तुमचे प्रेम आणि आपुलकी मागणार. माझा गुरुबंधू कसा आहे, कसा नाही हे पाहण्यासाठीच, तो जवळ येतो. म्हणून शुद्ध स्फटिका सारखी वर्तणूक ठेवा. या संदेशाप्रमाणे चाला. जे महान तत्व दिले आहे, त्याचा उजाळा करा. हेच संदेश आहेत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page