कपिल मुनी – आपले सेवेकरी मोठे आहेत. त्यांनी लहान मुलांप्रमाणे आंतून बाहेरुन शुद्ध होणे. जे आपले बोल, ते सतच काढणे. तो बोल झेपेल तसाच काढणे. काही मानव सेवेकरी जी गोष्ट नको, त्या गोष्टींकडे वळतात. कांहीना अन्न वस्त्र सुद्धा मिळत नाही. जे या बाबतीत श्रीमंत आहेत, ते अशा माणसांकडे लक्ष देत नाहीत. ते आपल्याच मायावी मी पणात दंग असतात. त्यांनी गरीबांकडे लक्ष द्यावयास पाहिजे. ते देत नाहीत. आपल्याच मोठेपणात दंग असतात. आपणाला मोठेपणा काय करायचा? एकच, सद्गुरु ध्यानात, अखंड नामात दंग असणे. हाच मोठेपणा. हेच कपडे. हेच दागिने. अशा या परमानंदात न्हाऊन निघावयास पाहिजे. याच्या पलीकडे आनंद कोणता? सेवेकरी भलत्याच गोष्टीला भुलतात. त्या गोष्टींपासून आनंद होतो, तो नको आहे.
मायावी आनंद कोठपर्यंत? हा जो परमोच्च आनंद आहे, त्याचे खंडण कधी होईल कां? तोच शेवटपर्यंत टिकेल. त्याप्रमाणे वागा. वाटचाल करा. सद्गुरू सांगतात, त्या तऱ्हेने वागा. त्यांच्या पुढे लोटांगण घाला, तरी आनंद आहे. आपला सेवेकरी वाममार्गी जाऊ नये, तो अन्य योनीत भटकावा अशी त्यांची इच्छा नसते. ते कष्ट घेतात. तरी सुद्धा त्याला ते कष्ट म्हणत नाहीत. आनंदाने सेवेकऱ्यांशी वागतात. आनंदाने सेवेकऱ्यांसाठी सर्वस्व करतात. आपणाला एकच हवे आहे. आपले सद्गुरू कसे आहेत, ते कोणत्या रितीने सांगत आहेत, त्याचा अंत घेणे. या कुडीतून अविनाशी आत्मा बाहेर पडेपर्यंत त्यांना एकदा तरी डोळे भरून पाहणे. ज्यांनी पाहिले, अंत घेतला, तोच भाग्यवान होय. ©️