या जगाचा निर्माता फार वेगळा आहे. मी निमित्त मात्र आहे. अशा चाकोरीने जर वाटचाल केली, तर त्याला मी दूर आहे असे वाटणार नाही आणि त्यांनी वाटूनही घेऊ नये. पण ऐकतो कोण? सेवेकऱ्यांना गती देऊन सुद्धा कोलांट्या उड्या घेतात. तेव्हा सेवेकऱ्याने आपल्या मनाला कोलांट्या उड्या घेऊ देऊ नये. हे संदेश आहेत. मला पाहण्याचा प्रयत्न करा. ज्याने सद्गुरुना ओळखले, त्याला परब्रम्ह दूर नाही. पण अशा चाकोरीने सेवेकऱ्याने जाण्याचा प्रयत्न करणे.
अनेक मानव अनेक तऱ्हेने सांगतात. ते का आणि कशासाठी? याचे कारण असे की, भक्तीची अंगे दोन आहेत. म्हणून ज्या अंगाने जो जातो, त्याप्रमाणे त्याला गती मिळते. म्हणून वाद निर्माण होतो. त्यामुळे सत्य बाजूलाच राहते. म्हणूनच काथ्याकुट होतो. म्हणून असला काथ्याकुट टाळण्याचा सेवेकर्यांनी प्रयत्न करावा. वेळ प्रसंगी आपले सत्य मांडण्याचा प्रयत्न करणे.
या दरबारातील सत्य काय आहे याची गती आपणाला मिळाली आहे. भाग्यवान सेवेकरी आहेत म्हणून या ठिकाणी आले आहेत. काही बाहेर आहेत, ते पण येणार आहेत. म्हणून आपण सन्मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणे.
सृष्टीची रचना – “प्रथम मी चैतन्य आकार, त्यापासून धुनधुनकार, धुनधुनकारापासून ओंकार, नंतर माया, मायेपासून त्रिगुण, नंतर त्रिगुणी माया ! यापासून सूक्ष्म जग निर्मिती आणि यानंतर जडत्वात फेकण्यात आले आणि अशा रितीने सृष्टीची रचना झाली.” ©️