नभासारीखे रुप या राघवाचे । मनी चिंतीता मूळ तुटे भवाचे ।। नभ म्हणजे काय? नभासारीखे रूप म्हणजे काय? इतकेच सांगता येईल की, त्याचे चिंतन केले किंवा आकाशासारख्या रंगात जर तो अह:र्निशी चिंतनात राहिला, तर त्याला काही न्यूनता नाही. त्याचे सर्व शरीरात रूप भिनले जाते.
भव म्हणजे काय? आणि भय म्हणजे काय? संसारात भक्ताला कोणत्याही तऱ्हेचे भय नसते. तो निर्भीड असतो. बेफिकीर असतो. तो बेफिकीर कशामुळे असतो? भक्त बेफिकीर कोणत्या कारणाने असतो? असा मानव जो आहे, त्याला भीती नाही. तो कसा असतो? कोणाच्या ध्यानात असतो? त्याची भय भीती कोणत्या कारणास्तव हरपलेली असते? तर एकच, तो अह:र्निश सद्गुरु प्रकाशात, सद्गुरु ध्यानात असतो, म्हणून तो भीती किंवा भय रहित असतो.
संसारात, मायावीत त्याचे मन रमेल का? नाही. एकाचा त्याने अंत घेतलेला, ध्यास घेतलेला असतो, मग त्याला भीती वाटेल का? तर नाही. काही संतांनी असे सांगितले की, “मरावे परी, कीर्ती रूपे उरावे”। काही म्हणतात, “मरावे पण, रुपये पाठीमागे राहावे” म्हणजे त्यांचा बालबच्चांचा निर्वाह त्या रुपयांवर होईल. पण किर्ती कोणत्या रूपाने राहील? दोन्ही मार्गाने कीर्ती राहते. सत् आणि असत ! (पुढे सुरु….२)©️