अलख – कोणाला सेवेकरी म्हणायचे? सेवा दिली तो सेवेकरी नव्हें ! तन, मन, धन एव्हढेच नव्हे, तर मनाच्या पलीकडचे जे चित्त ते सदगुरू चरणांवर अर्पण करावयाचे असते. असे ज्याने केले, तो सेवेकरी होय.
हा दरबार साधा नव्हें, दैवतांचा तर नव्हेच नव्हें आणि शक्तीचाही नव्हें अगर त्रिगुणात्मक सुद्धा नव्हें. त्या पलीकडचा हा दरबार आहे.
या दरबारात लाघव कोणाचेही चालणार नाहीत. सत् बाहेर काढण्यासाठी अहोरात्र हा दरबार धडपडत असतो. सर्वांना दर्शनाची फार तळमळ असते, मग कोणत्याही स्थितीत ते असोत, सर्वांना दर्शनाची तळमळ आहे. (समाप्त)©️