Path
! ॐ तत् सत् !
सत् भक्तीचा प्रकाश
चार तत्त्वे
परधन
दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा न करणे
परस्त्री
परस्त्री आपल्या मातेसमान मानणे
खोटे न बोलणे किंवा खोटे न करणे
मिथ्य अथवा खोटे बोलणे नाही
मद्यपान व नशिले पदार्थ सेवन न करणे
मद्य प्राशन तथा मादक, नशिले पदार्थ सेवन व्यर्ज्य करणे.
संसार म्हणजे तरी काय ?
संसार म्हणजे सगुणाचे सार – येणे नाम संसार!
ऋद्धी आणि सिध्दी यापासून होणारे चमत्कार हे सर्व लाघवी मायेचे खेळ आहेत. त्याठिकाणी सत् तत्वाचा वास कदापि सापडणार नाही. सत् भक्तीच्या ठिकाणी चमत्कार आढळणार नाहीत. सत्भक्ती चमत्कार रहीत आहे. त्याठिकाणी जे चमत्कार असतात, ते स्वयम् आणि अखंड चमत्कार असतात. ऋध्दी, सिध्दी सारखे भुरटे चमत्कार नसतात. तेथे सत्भक्तीचा दीप अखंड तेवत असतो. तो विझवण्याची कोणाचीही प्राज्ञा नाही.
ऋद्धी आणि सिध्दी यापासून होणारे चमत्कार हे सर्व लाघवी मायेचे खेळ आहेत. त्याठिकाणी सत् तत्वाचा वास कदापि सापडणार नाही. सत् भक्तीच्या ठिकाणी चमत्कार आढळणार नाहीत. सत्भक्ती चमत्कार रहीत आहे. त्याठिकाणी जे चमत्कार असतात, ते स्वयम् आणि अखंड चमत्कार असतात. ऋध्दी, सिध्दी सारखे भुरटे चमत्कार नसतात. तेथे सत्भक्तीचा दीप अखंड तेवत असतो. तो विझवण्याची कोणाचीही प्राज्ञा नाही.
मानव हाच ईश्वरी अवतार आहे. ईश्वर आहे याची चिकित्सा मनु+ईष म्हणजेच मनुष्य होतो. पुढचा ईश घेतला तरच ईश्वर प्राप्ती होऊन मनुष्य हाच साक्षात ईश्वर आहे याची जाणीव होईल आणि मनु घेतला व ईश वगळला तर मनाच्या अधिन होऊन तो इकडे तिकडे सैरावैरा भटकत राहिल व हैवान बनेल. मग त्याला ईश्वर प्राप्ती अगर ईश्वर दर्शन होणे दुरापास्त आहे.
त्यासाठी अंतःकरणाचे ठिकाणी सारखी तळमळ ठेवली पाहिजे. तेव्हांच ईश्वर प्राप्ती होईल. वरपांगी ढोंगाने काहीही मिळू शकणार नाही. मनाचे ठिकाणी सद्गुरुं विषयी अढळ श्रद्धा, दृ:ढनि:श्चय, व प्रबळ ईच्छाशक्ति असली की सद्गुरु भेट आपोआप होते.
सद्गुरुं शिवाय स्वःप्रकाशाची दिशा सांपडणार नाही, तर मुक्ती मोक्ष कुठचा? सद्गुरु शिवाय तरणोपाय नाही. गुरु आणि सद्गुरु यामध्यें अंतर आहे.
सद्गुरुं शिवाय स्वःप्रकाशाची दिशा सांपडणार नाही, तर मुक्ती मोक्ष कुठचा? सद्गुरु शिवाय तरणोपाय नाही. गुरु आणि सद्गुरु यामध्यें अंतर आहे.
सत् हे फार अचल आहे. त्याचा कोणीही अजून अंत घेतलेला नाही, घेणे शक्य नाही आणि घेऊ शकणार नाही. असे हे परम् निधान आहे. यांना ना आदि, ना मध्य आणि ना अंत, असे हे परमतत्व सर्व ठिकाणी व्यापक असूनही अलिप्त आहे. तेव्हां मानवांनी सद्गुरु हे काय तत्त्व आहे? याचा प्रथम अनुभव घ्यावयास पाहिजे. त्याठिकाणी मनाची चलबिचल न करता ठाम व सत् शुद्धवृत्तीने व सद्भावनेने रत झाले पाहिजे. तरच त्या सताचा शोध लागेल. म्हणूनच अशांची भक्ती करणे ही महान तपःश्चर्या आहे.
भक्ती ही प्रत्यक्ष परमेश्वराने मनुष्य प्राण्याच्या उध्दारासाठी, सद्गुरुंच्या मुखाने देणगी म्हणून दिलेली भेट आहे. कारण ८४ लक्ष योनीं मध्ये, मानव योनी श्रेष्ठ आहे. मानव योनीतच सताची ओळख होते. म्हणून सहज, साधारण नाम म्हणजेच भक्ती. ते नामस्मरण अंतःकरणाच्या तन्मयतेने झाले पाहीजे. नामाशिवाय मनुष्य जन्माची गोडी लागत नाही.
सत्भक्ती साठी सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी योग्य सद्गुरूंचा शोध केला पाहीजे. सद्गुरू कृपेवाचून देव दर्शन मिळणे कठीण आहे. तेंव्हा ही सत्भक्ती कोणत्या त-हेने करावी ?
प्रार्थना म्हणजे काय ?
तर परात्पर, क्षराक्षर, चराचर असे असणारे तत्व ! अर्थात असणारे व अनर्थातही असणारे व त्याच्याही पलीकडे उरलेले असे जे महान तत्व, ज्याचा अंत नाही, पाहिले तर सांगता येत नाही, धरता येत नाही, कवटाळता येत नाही, कडकडून भेटता येत नाही.
पण मानवाने सत्शुद्ध अंतःकरणाने त्याना आळवले, एकाग्र चित्ताने त्यांची प्रार्थना केली की तेच निराकारी तत्व सगूण रुप धारण करुन सत्भक्ताची ईच्छा पूर्ण करतात. त्यासाठी भगवंताची प्रार्थना कशी असावी? याचेच मार्गदर्शन आरतीच्या छोट्या पुस्तकांत केलेले आहे. त्याचा सेवेक-यांस अवश्य फायदा होईल. असे आम्हांस वाटते तरी सेवेक-यांनी याचा प्रत्यक्षांत अनुभव घ्यावा अशी विनंती.