Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

सत् भक्तिचा मार्ग ©️

कुंभ मुनी - सत तत्वात रममाण होण्यासाठी, सत् भक्तिच्या मार्गाने जाणाऱ्या ज्योती क्वचितच असतात. समर्थांना श्रद्धायुक्त ज्योती पाहिजेत. श्रद्धा डळमळीत असली तर या मार्गात तो टिकू शकणार नाही. काहीही होवो, श्रद्धा डळमळू देता कामाची नाही. हे स्वयमेव तत्व आहे.‌ याचा वास अंत:र्यामी आहे. ३३ कोटी दैवते आपल्यातच आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आपल्यातच आहेत. ३६ कोटी…

Read More

आधी बीज एकले – भाग दोन ©️

एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे, हे जर ओळखले, तर कोणते प्रणव निघतील? कोण बोलतो आहे, याचा विचार केला, तर त्या ठिकाणी कसे वागावे त्याची खूणगाठ बांधावी, तरच बीज दाता हाताशी सापडेल. त्याची ओळख होईल. ओळख झाली नसती तर या ठिकाणी रममाण झाला नसता. ओळखून सुद्धा पळवाट काढली तर त्याचा अनुभव आपल्याला अवश्य मिळेल. अनुभव…

Read More

आधी बीज एकले…..©️

श्री समर्थ मालिक – "आधी बीज एकले | बीज अंकुरले | रोप वाढले ||""एका बीजापोटी, तरु कोटी कोटी | जन्म घेती सुमनें-फलें ||""व्यापुनि जगता तूंहि अनंता | बहुविध रूपें घेसी, घेसी परि अंती ब्रह्म एकले |" आधी बीज, त्यानंतर फळ. फळात परत बीज निर्मिती. त्याचा मानव उपभोग घेतो. मूळात बीज कोठून निर्माण झाले? बीजाची पैदास…

Read More

मुक्त होता परी बळें – भाग (२) ©️

जन्माला फेकल्यानंतर तो भक्त कसा असतो? कर्माच्या शाखा दोन – सत् आणि असत ! मग असत मार्गाने गेल्यानंतर तो पूर्ण बद्ध झाला. मग तो जन्माला आला काय आणि नाही काय सारखाच ! समर्थ आपल्या ऋणातून मुक्त होतात. त्याला, मानव जन्म देतात. मग पुढे तो मायेच्या आधीन बनून असत मार्गाने जातो. मग, करतो ते मीच करतो…

Read More

मुक्त होता परी बळें जाला बद्ध । ©️

मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥ तुका म्हणे गेलें व्यर्थ वायां विण । जैसा मृगसीण मृगजळीं ॥३॥ एखाद्या महान भक्ताला किंवा सेवेकऱ्याला, अह:र्निश सद्गुरु ध्यानात, नामात तल्लीन असता, रात्रंदिवस कष्ट केलेले असता, थोडक्यात शेवट शेवट, मुक्ति मोक्ष…

Read More

तुका झाला सांडा, विटंबती पोरे रांडा ! ©️

श्री समर्थ मालिक - संतांच्या म्हणीप्रमाणे भक्ती कशी आहे?      तुका झाला सांडा ! विटंबती पोरे रांडा !! मग भक्तिसाठी कसे झाले पाहिजे? भक्त हा समर्थांसाठी, भक्तिसाठी, सांडा होतो. भक्त सांडा झाल्यानंतर, भगवंत सुद्धा त्याप्रमाणे होतात. भक्तिची विटंबना झाली तर ती भगवंताची विटंबना होते. भक्त सांडा झाल्यानंतर कोणी काही म्हणो, त्याची चाड भक्ताला पण…

Read More

सेवेकरी चकतो का? – २ ©️

येथे सांगितले जाते, ते अनुभवातले सांगितले जाते. प्रत्यक्ष सहजासहजी विषयी निघाला की त्याच्यावर प्रवचन सुरू होते. सत् सानिध्यात फार नितांत श्रद्धा असावी लागते, नाही पेक्षा जसे सेवेकरी तसे मला वागावे लागते. सेवेकरी नितांत, मी पण नितांत. सेवेकरी आत बाहेर, मग मलापण नाईलाजाने तसे वागावे लागते. अहर्निश प्रापंचिक बाबी करता, काबाड कष्ट करता, एरवी ज्योती…

Read More

सेवेकरी चकतो का? ©️

श्री समर्थ मालिक - सेवेकरी चकतो का? कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते त्याच्यावर सेवेकऱ्याने बाहेर वाच्यता न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार नाहीत. जो सेवेकरी येथे ऐकतो व बाहेर गेल्यानंतर विसरतो, त्याला अनेक विवंचना निर्माण होतात व त्यातच तो गुरफटला जातो. खरोखरच येथील सेवेकऱ्यां जवळ एवढे अखंड तत्व सतत पाठीशी…

Read More

…एक भक्त, एक कां वैरी – श्री समर्थ मालिक ©️

मी असतो सर्वांचे शरीरी ! तरी एक भक्त, एक का वैरी !! दीपकाचे अंगी नाही दूजा-भाव ! चोर आणि साव सारखेची !! चोर असो अगर साव असो, प्रकाश सर्वांना सारखाच मिळतो. तद्वतच आपल्या दरबारच्या शिकवणीचा मार्ग आहे. हा राजमार्ग आहे. या मार्गाने गेल्यानंतर चोर असो वा साव असो, त्याच्याशी आपला संबंध नाही. या ठिकाणी सुद्धा…

Read More

नामस्मरण कसे करावे – अलख – भाग तीन ©️

सेवेकरी म्हणतील, येथून उतरल्यावर आसन रिकामे असते, तर आसन कधीही रिकामे नसते. मालिक येथेच बसलेले असतात. स्थूलांगी तिकडे जातात. आपण काहीही केले, तरी त्यांच्या नजरेतून सुक्ष्माहूनही सुक्ष्म सुटत नाही. तुम्हीं प्रथम आपल्या गुरूंचे दर्शन मिळविले तरच पुढे मार्ग मिळेल. गुरू दर्शन सोपे नाही. गुरू दर्शन हाच शेवट…

Read More

नामस्मरण कसे करावे – अलख – भाग २ ©️

आपल्या दरबारची चार तत्वे आहेत. त्यांचे पालन करा. जो बोल काढला, त्या बोलाला महत्व आहे, तो सत् करा. जी कृती हाती घेतली, ती पूरी करा. ते न करता, सेवेकरी दुसरेच करतो. जे गुरू, ज्यांचा शिरी हस्त पडला, त्यांनी मार्ग दाखविला, त्यांची ओळख ठेवणे, त्यांना पाहणे कठीण तितकेच सोपे देखील आहे. पण कसे? त्या मार्गाने…

Read More

नामस्मरण कसे करावे – अलख ©️

नामस्मरणात बसल्यानंतर, अखण्ड नाम चालू असताना मन मायावी जाळ्यात गुंतवले त्याला अर्थ नाही. असे नामस्मरण मालकांच्या चरणांवर रूजू होईल काय? तासन् तास बसण्यापेक्षा पाचच मिनिटे बसा. सर्वस्व विसरा. मालिक आणि मी, बाकी काही नाही. अशा तऱ्हेने बसलात तर होईल. तासन् तास बसून, दुनियेच्या वदघटित मन गुंतवणे, विचार करणे, त्या नामाचा उपयोग नाही. तसे न करता,…

Read More

You cannot copy content of this page