श्री गुरुदेव पितामह – पूर्वी होऊन गेलेल्या युगाची मानवांना गणती आहे कां?सत् आणि असत ! पूर्वींचे सतयुग, आता कलियुग दाखवित आहे. नव्हे, दोन्ही युगे चालू आहेत. जो पूर्णांगी सत वागतो तो सतयुगातला आणि जो असत वागतो, तो असत युगातला होय, म्हणजे कलियुगातला होय.
आदीअंतापासून अवतार कार्ये चालू आहेत याची गणना मानवाने केली आहे कां? युगें मानवांच्या दृष्टीने झाली आहेत. आदीअंतापासून अवतार कार्य चालू आहे, मग युगें किती झाली असतील?
श्री समर्थ मालिक – ज्या वेळेला सत् युगाचा काळ होता, त्या वेळेला असत फारच कमी प्रमाणात होते, पण ज्या वेळेला मानवांच्या गरजा वाढल्या, त्या वाढल्यानंतर मानव शोध करु लागला. शोध करता करता, त्या गरजा पुऱ्या करण्याकरीता, तो मायेच्या आधिन गेला.
त्यामुळे मायेने त्याच्या भोवती आपले जाळे विणले. अशा तऱ्हेने मानव पूर्णत्वाने मायेच्या जाळ्यात गुरफटला गेला. त्यावेळी मालकांना विचार पडतो. नंतरच मानवांना शुध्दीवर आणण्यासाठी अवतार कार्य सुरु होते. तो काळ हा ! ह्याच काळाला सत् युग म्हटले आहे.
हल्लीचा व्यवहार आणि पूर्वीचा व्यवहार यांत अंतर होते. त्यावेळचे मानव सत् होते. सर्वस्व सत् होते. थोडीशी जरी चूक झाली, तरी महान शिक्षा होत होती. ज्यावेळी माया मानवांत शिरली, तेव्हाच मानव असत्यात शिरला. त्याला सत्यात आणण्यासाठीच अवतार कार्य नटवले. ©️