Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास | ©️

मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास | ©️

श्री समर्थ मालिक – मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास | कठीण वज्रास भेदू ऐसे | मऊ मेणाहूनी म्हणजे लोण्यापेक्षाही मऊ असा सेवेकरी कोण होता? संत तुकाराम मऊ होऊनच वज्रापेक्षा कठीण असणाऱ्या तत्वाला म्हणजे प्रकृतीला, कष्ट मिळाल्यानंतर भक्ती कठीण आहे असे त्याने सांगितले. म्हणून वज्रापेक्षाही कठीण असले तरी लवचिक कसे होते, कसे करावे हे तुकोबाला माहित होते अन् म्हणून त्याने म्हटले आहे, लोण्यापेक्षाही मऊ म्हणजे त्रिवेणी संगम त्यात आला की नाही? मग मेणापेक्षा मऊ असे ते भक्त, त्या तत्त्वांपाशी मौन धारण करून असतात.

तुकोबा जेव्हा जागृतीत दंग होत होते, त्यावेळी त्यांना कठीणता भासत होती का? आताचे सेवेकरी आहेत त्यांना कठीणता भासते. हे बोल त्यांनी केव्हा काढले? आपल्या तल्लीनतेतून उतरल्यानंतर काढले की आधी काढले याची छाननी करावयास हवी.

अनुभव तैसाच अधिकार, अधिकार तैसाच अनुभव ! त्याप्रमाणे त्यांने कर्तव्य केले. तुकोबांनी अगोदर हे कशासाठी म्हटले होते अन् का म्हटले होते? कारण ती ज्योत त्या पात्रतेची होती. जोपर्यंत अनुग्रह नव्हता, त्याच्या अगोदरचे बोल असावेत. कितीही त्रास झाला, अडीअडचणी आल्या, पर्वत कोसळले, तरी त्यांचा देह विचलित झाला नाही. आत्ताच्या सेवेकऱ्यांना थोडासा त्रास होऊ द्या, मग बघा तो काय म्हणतो? मग आताचे सेवेकरी मऊ मेणाहूनी मऊ आहेत का नाही? पण समर्थांचा दृष्टिकोन आहे, तो त्यांनी सोडला आहे का? थोडासा जरी त्रास झाला की, सेवेकऱ्यांची धावपळ होते. चार शब्द वेडेवाकडे बोलून, काखा वर करून, उभा राहण्यास तयार. थोडासा जरी त्रास झाला की, बाबा काय, आम्ही सेवेकरी असे म्हणावयास मागे पुढे पाहत नाही. परंतु सद्गुरुंनी त्या दृष्टीने पाहिले आहे कां? पुढे सुरु…..२ ©️

You cannot copy content of this page