Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

स्वयंभू ! ©️

स्वयंभू ! ©️

आपले कार्य अजून पुष्कळ पडलेले आहे. ते कार्य नको का करायला? मग असे करून कसे चालेल? याच्या पेक्षाही महान कार्ये दरबारात येणार आहेत. आता उघड करण्याचे काही कारण नाही. त्या कार्याकरिता या सेवेकऱ्याना कसून घेतलें पाहिजे. जर आता कसून घेतले नाही, तर याच गतीने वाटचाल करून पुढचे कार्य अपुरे राहील. अशा रीतीने सेवेकऱ्यानी कार्ये केली तर, गादीची इभ्रत राहील काय?

हल्लीचे जग कशा रितीने चाललेले आहे आणि पुढचे जग दुप्पट वेगळ्या रितीने जाणार आहे. हल्लीचे जग एकपटीने बरे आहे. याच्या दुप्पट रितीने पुढचे जग जाणार आहे. वेगळ्या रितीने चालणार आहे. हे लक्षात ठेवा. जर या सेवेकऱ्याना गादीवर बसविले तर गादी अशीच सांभाळतील काय?

आपल्याला असत्याचा नाश करावयाचा आहे. जगात ईश्वर आहे हे मानवाना दाखवायचे आहे. हल्लीचे जग, ईश्वर असून देखील नाही म्हणत आहे. कारण त्यांच्या इच्छा तृप्त होत नाहीत. जे पाहणारे आहेत, त्यांना ते कळते. ईश्र्वर आहे की नाही, त्याचा अंत फक्त पाहणाऱ्यालाच माहित आहे. इतरांना नाही. पुढचे जग याच्या दुप्पट वेगळ्या रितीने चालणार आहे. म्हणून बजावित आहे. जाणीव नीट घ्या. वाटचाल चांगल्या रितीने चाला म्हणजे तुम्हाला पुढच्या कार्यात अडथळे येणार नाहीत. तुम्हाला थोड्या दिवसा नंतर कार्यासाठी दुसरीकडे पाठविण्यात येणार आहे. म्हणूनच सेवेकऱ्यांचा कस घेवून पहात आहे. ज्या ज्योती पुढें चालल्या आहेत, त्या जर कसाला उतरतील तरच कार्यासाठी दुसरीकडे पाठविल्या जातील. सेवेकऱ्यांचा कस न घेता जर कार्यासाठी पाठविल्या तर गादीची इभ्रत जायला वेळ लागणार नाही. अगोदर या जगात ईश्वर आहे हे दाखवायचे आहे. आपले सेवेकरी कार्य नीट बजावू शकले नाहीत तर गादीची इभ्रत राहील का? म्हणून कस घेवून जे कसाला उतरतील त्यांनाच कार्याला पाठविले जाईल. लक्षात ठेवा. आज आपल्या हातून अनेक कार्ये व्हावयाची आहेत. त्या कार्यात सत्य हेच दर्शवायचे आहे. मग असे करून कसे चालेल? मग सेवेकऱ्यांचा कस नको का घ्यायला? याच्यावर पुष्कळ सांगावयाचे आहे. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page