– श्री कण्व मुनी –
सत् सेवेकऱ्यांच्या ठिकाणी सुडाची भावना कधीही नसावी. या उलट अघोरांकडे ती असते.
सत् शिष्य म्हणजे ज्याच्या ठिकाणी प्रज्ञाशिलता व समता असते तो होय.
कितीही श्रेष्ठ सेवेकरी असेल, पण यत्किंचीत तमोगुण त्याचे जवळ असेल, तर त्याची किंमत मालकांजवळ नसते.
सेवेकरी दरिद्री असो, कसाही असो पण पूर्णांगी सत् असेल तर मालिक त्याच्यासाठी वाटेल ते करतात.
– शकुंतला –
कर्तव्याच्या ठिकाणी मायावी नाते नाही. त्यांना आदर द्यावा पण तो कोणत्या वेळी? प्रत्यक्ष सद्गुरुना बनविणे महान अघोरी चूक आहे. अनेक जन्म घेतले तरी, क्षमा होणे कठीण. पूर्वी अशी गती होती.
…….सौ. माधवी (श्री कण्वमुनींची अर्धांगिनी)……
समक्ष सामना केला असता तर विश्वामित्र आमच्या पुढे कवडी किंमतीचा होता. कोणत्याही कार्यावर पूर्णत्वाने विचार केल्यानंतर, त्याची गती वेगवेगळी मिळते. मी सुद्धा एक सेवेकरीण आहे. माझी तप:श्चर्या जादा असली तरी सर्वांना हक्क समान आहेत.
संसारात राहूनच परमार्थ साधा. सत् मार्गाने जा. मी सुद्धा एक सेवेकरीण आहे. कोणी महान नाही. ज्याच्या अंगात मी पणा, गर्व आहे, ज्याची भावना मी कोणी विशेष आहे, अशांची गती काय होते, हे आपण पहात आहोत.
सत् सेवेकरी आणि सेवेकरीण यांचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. प्रत्येक क्षणाला किंमत असते आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने वाटचाल करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. श्रवणी, वाचा, दृष्टी कोणत्या तऱ्हेची असावी? तर सर्वस्व मालिकमय पाहिजे. ज्या ठिकाणी पहाल त्या ठिकाणी मालिक. जे शब्द ऐकाल, ते मालकांचे. सर्वस्व मालिकमय बनल्यानंतर गतीला वेळ नाही. मग का वेळ मिळणार नाही? सेवेकरीणीने पूर्णत्वाने मालिकमय बनावयास पाहिजे. ज्या जिभेने नामस्मरण करता त्या जिभेने अभद्र शब्द काढावयाचे नाहीत. अशा सेवेकरणीची दृष्टी सताकडेच वळत असते. असताकडे वळत नसते. असताकडे जाणार नाही. आपल्या काही ज्योती ठाम नाहीत. ©️