अनेक वेळेला सांगितले आहे, ज्योतीर्मय शुभ्र शांत वर्तुळातून आंत जायचे. असे असताना सुद्धा सेवेकरी चकतात. लाघवी तऱ्हा कुठपर्यंत असते. अनेक वेळा सांगितले, दहाव्या द्वारापासून अकराव्या द्वारापर्यंत लाघवीचे खेळ होतात. पुढे लाघवीला गती नाही. सेवेकऱ्यांना अनेक वेळेला सांगितले, शुध्द शुभ्र स्फटीकासारखे वर्तुळ आहे, त्यामध्ये गेले म्हणजे स्थिरत्व प्राप्त होते. प्रकाशाची गती घेताना, प्रकाशाची जाणीव घ्यावयाची. मात्र वर्तुळ गोलात जात असताना जी गती होते, त्याच वेळेला लाघवीचे खेळ होतात. प्रवेश होताना प्रकाशात फरक झाला तर एकचित्तता सोडावयाची. फक्त प्रवेश होताना गती राहत नाही. कधी शुभ्र प्रकाशपण लाघवी तऱ्हा, चकचकीत चमचम निर्माण करते. चंचलत्व निर्माण करते कि समजावे, लाघवी तऱ्हा आली. प्रकाशात फरक आला तर विचारणा करणे. वलय शुभ्र चकचकीत आहे. मी कोणत्या मार्गाने येऊ? या ठिकाणी सेवेकऱ्याचे कोडकौतुक करू पाहतात. लाघवीची शक्ती अचाट आहे. वर्तुळाच्या बाहेर मात्र ती बनविते. सेवेकरी मानवी आहेत, मायावी आहेत, तरी चिंता नाही. ©️
पण इतकेच आहे की, अघोराचा कोणत्या तऱ्हेने नाश करणे हे मी जाणतो. हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते सोडणार नाही. हे …