श्री समर्थ मालिक – स्थूल जडत्वाला काय होईल आणि काय नाही याचा नेम नाही. जडत्वाला व्याप झाले तर मानव कासावीस होतो आणि अशाच वेळेला त्याला परमेश्वराची आठवण होते. जडत्वाच्या पाठीमागे व्याप लागल्यानंतरच मानव देवाचे नाव घेतो. देवाचे ध्यान करतो. अखेर ईश्वरा जवळ शांती मिळविण्यासाठी ओरडतो. पण खरोखर जडत्व जे आहे ते वर्षाचे १२ महिने सुखी असेल का? आणि शांततेत सुरुवाती पासून जडत्व राहील का? सुखी जडत्व राहण्यासाठी अहर्निश ध्यानात, नामात निमग्न राहिले पाहिजे. मग जडत्वाला त्रास होईल का? आणि अशाप्रकारे निमग्न झाला तर त्याला सुख आणि दुःख समान वाटते.
श्री समर्थ मालिक – अखंड सेवा हि दिलेलीच असते. परत मागण्याची जरुरी नसते. ती दिलेली असते. सेवेकऱ्यांना ती टिकविता येत नाही, म्हणून …