Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

कैलासपती शिवशंकर…… प्रवचन ©️

कैलासपती शिवशंकर…… प्रवचन ©️

साक्षात मानव प्राणी येथपर्यंत (कैलासापर्यंत) येऊ शकत नाहीत.

महाशिवरात्र म्हणजे काय? शिव कोण?

स्वयंभू – आमच्या पेक्षाही शिव फार निराळा आहे. त्यांच्याच ध्यानात मी नेहमी निमग्न असतो. मी जर शिव असतो, तर येथे आसन टाकून बसण्याची जरूरी नाही. खरा शिव फार वेगळा आहे. आम्हीं त्यांच्याच आधीन आहोत. देव दानव सर्व त्यांच्याच आधीन आहेत. ते सर्व ठिकाणी व्याप्त असून अलिप्त आहेत. तेच जगत् चालक, जगत् व्यापक, अनंत नामे अनंत रूपात नटलेले आहेत. त्यांच्याच ध्यानात मी असतो. जे स्वयं आहेत, तेच खरे स्वयंभू होय. आम्ही जर स्वयंभू आहोत म्हणावे तर आम्हाला पूर्ण जाणीव आहे की आम्हाला कोणीतरी पाठविले आहे. त्याचप्रमाणे आम्ही कार्य करीत असतो.आम्ही पवित्र जर म्हणावे, तर आपल्या (सद्गुरुंच्या) आदेशाचा मान ठेवून येथपर्यंत धाव का घ्यावी लागली? (गुरु गुह्य)

मघाशी मी सांगितले आहे की, तुम्हां आम्हां सर्वांना उत्पती, स्थिती, लय करणारी ती महान शक्ती फार वेगळी आहे. इतकाच आनंद वाटतो की आतापर्यंत मानवलोकी या मार्गाने, रस्त्याने गेलेले माझ्या दृष्टीस आलेले नाहीत. आता आपण काहीं मानवांनी, स्वतः आम्ही ज्यांच्या ध्यानात असतो, त्यांच्या प्रत जाण्याचा मार्ग चोखाळला आहे, म्हणून आम्ही प्रथम तुमचेच आभारी आहोत आणि म्हणूनच आसनावरून जे आदेश सुटले, त्या आदेशाला मान देवून धावत येणे क्रमप्राप्त झाले.

आता इतर किती तरी लोक भक्ती करतात. रात्रंदिवस त्या टाळ मृदंगाला चैन नाही. त्यांच्या तोंडालाही चैन नाही. रात्रंदिवस ओरडत असतात. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग, इतकंच काय कंठ अगदी शोषून जातो. त्याची सुद्धा पर्वा करीत नाही. मात्र पांडुरंग कोण? विठ्ठल कोण? कोठे आहे? कसा आहे? हे मात्र अजिबात कोणी पाहिलेले नाही. मलासुद्धा कोणी पाहिलेले नाही. आम्हाला जरी गुरूची पदवी असली तरी आम्हीं त्रिगुण, मायेतच आहोत, म्हणून गीतेमध्ये वर्णन केलेले आहे. आपण वाचलेले आहे, परत मी सांगू कशाला?

गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर:

गुरूर्एकं परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ||

याच्यापेक्षा आम्ही कसले गुरु? गुरु ही चीज फार निराळी आहे. म्हणून आम्हाला त्यांच्यापुढे काहीं करता येत नाही. उपदेश करीत जरी असलो, तरी ज्याची त्याची जशी कृती आहे, त्याप्रमाणे ते झाले आहे, चालले आहे, चालत आहे. ज्याच्या त्याच्या अधिकाराने, अधिकाराप्रमाणे चालले आहे.

आम्हीं तिघे जरी अधिकारी असलो, तरी त्या तिघांना आपणच चेतना देणारे आणि आपल्या आदेशाशिवाय आम्ही कोठेही कांहीही करू शकत नाही. (गुरु गुह्य) आमचा अधिकार हा किंचित. त्याला काही किंमत नाही असे म्हटले तरी चालेल. आपल्या हाती सर्व सत्ता आहे, तशी ती आमच्या हाती नाही. (गुरु गुह्य ते हेच)

राक्षसांचा फैलाव कसा झाला म्हणावे तर मानव जर खऱ्या भक्तीत निमग्न झाले असते, तर त्या राक्षसांचा काय पाड लागला असता? राक्षस कोण? मानव कृतीहिन झाला म्हणजे राक्षस बनतो. कृतीहिन झाला म्हणजे कोणत्या तरी तत्वाला आधीन करतो. ते तत्व आधीन झाल्यानंतर, त्या तत्वाला मागणी पूरी करावी लागते. ती पूरी झाल्यानंतर तो मानव बेहोष होतो. मग त्याला असे वाटते की मी कोणाच्या बापाला भिणार नाहीं. मी सर्वस्वाचा धनी आहे. मग तो वाटेल त्या कृती करतो. विकोपाला गेल्यानंतर समर्थांना चिंता पडते. मग मालकांना अवतार कार्य घ्यावे लागते.

(येथे आपणास आपल्या सद्गुरु माऊलीने सांगीतल्याप्रमाणे कल्पना आहेच की जी जी म्हणून अवतार कार्ये झाली, ती ओंकारांची झालेली आहेत. तसेच आता पर्यंतच्या उहापोहा प्रमाणे पाहता – ह्याची कल्पना कोणत्याच तत्वांना अनंतानी दिलेली नसल्याने, क्षिराब्धी तसेच त्यांच्या खालील इतरही तत्वांना या गोष्टींची अजिबात कल्पना नाही की अवतार कार्ये कोणाची झालीत?)

मानवाची कृती मानवाच्या हातून खंडन कशी होईल याची मालकांना पुरेपूर जाणीव असते, म्हणूनच मानव कृती करता करता फसला जातो.

भक्तीचे बीजारोपण झाले तर, मानव वाईट कृतीने जाणार नाही. कोणाला त्रास होणार नाही. सगळीकडे एकच दिसेल. पण मानवात ती भावना नाही. तितकी पात्रता नाही. मानवात बुद्धीमत्ता वेगळी वेगळी आहे. ती तशी आहे म्हणून एकमेकांत वितंडवाद होतो. मग त्या भक्तीला काहीं महत्त्व आहे का?(समाप्त) ©️

You cannot copy content of this page