ज्या भक्ताला चमत्कार पाहिजेत, नाव पाहिजे, लोकांनी मानले पाहिजे, मी कोणीतरी आहे अशी ज्यांची भावना असते, महान साधू आहेत, त्याने जर चमत्कार दाखविले, तर हा कोणीतरी महान योगी आहे असे मानव म्हणतात.
पण मानवांना अद्याप कळलेले नाही, जो वाटेल त्या परिस्थितीत आपली सत् चाकोरी ढळू देत नाही, त्यालाच महान सत्पुरुष म्हटलेले आहे. त्याला सत आणि असत दोन्हीही सारखेच असतात. असताचे बोलामुळे त्याला जरी वाईट वाटले तरी तो वाईट वाटून घेत नाही. असत कशाच्या जीवावर बोलते हे त्याला सर्वस्व कळते.
ज्याच्या ठिकाणी तंत्र मंत्र, ऋद्धी सिद्धीचा वास आहे, अशा ठिकाणी सत राहणार नाही. त्याला वाटते ऋध्दी सिध्दी हेच सर्वस्व आहे. पण ज्या ठिकाणी हे सर्वस्व गुप्त आहे, ते त्याला कळलेले नाही. पण अशा ज्योतीला अखंड चमत्कार पहावयास मिळाले, तर ती ज्योत विचार करते. पण तो, लाघव का होत नाही असा विचार करतो. परंतु हे त्याला कळत नाही, कारण सताची जाणीव असणे फार दुरापास्त आहे. म्हणून सेवेकर्यांनी सत्कर्म योग गाठण्याचा प्रयत्न करावा. असा प्रयत्न केल्यास त्याला, योग म्हणजे काय, हे कळेल. (पुढे सुरु…..३) ©️