*आरती सद्गुरुंची उजळली अंतरी |* *प्रकाश थोर झाला, साठवेना अंबरी ||*
लक्षात घ्या नाम केंव्हाही घेऊ शकता, परंतु ते नाम सताप्रत पोहचविण्यासाठी मन सद्गुरू चरणांवर अर्पण करुनच नामस्मरण केले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता या स्थिती एकत्र होतील त्याचवेळी मन स्थिर होईल. सतात पूर्णत्व लय होणे म्हणजेच स्मरण करणे. अशा स्थितीत आपण नामाची स्थिती केलीत तरच ती सत् चतणांप्रत पोहचू शकते. तद्नंतर सताचे दर्शन आपण पूर्णत्वाने घेऊ शकता.
आपण ही ज्योत दिवा स्वरुपी प्रगट करीता, तिच ज्योत आपल्या आत्मस्थितीतही प्रगट असते ना ! आत्मा ही पण एक ज्योतच आहे ना ! तो आत्मा आपण मानवी स्थिती प्रमाणे सामुहीक स्थितीत प्रगट करु शकणार नाही. त्या परब्रम्हाचे स्मरण, दीपस्थितीने आत्म्याशी स्वरुप करणे अन् परब्रम्हाचे स्मरण करणे.
आम्ही देखील सताचे स्तवन करीतो, पण कोणत्या स्थितीने याची आपणास पूर्णत्व कल्पना आहे. परंतु मानवाला हे प्रतिक करावेच लागते. ते प्रतिक आपल्या हस्त स्थितीत नसेल तर आपण स्थिर होऊ शकणार नाही. लक्षात ठेवा आत्मज्योतीचे प्रतिक हा दीप आहे. ©️