अघोर मनाच्या आधीन बनल्यानंतर, तो मनाच्या आधीन होतो, मग त्याच्याकडून त्याच्याच मनाप्रमाणे कर्तव्य करून घेतो. असे करताना तोच खड्ड्यात पडतो. त्यातून वर निघण्यास त्याला पुष्कळ यातायाती पडतात.
आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती असत मातले आहे? सत् भक्तीचे वळण नाही. मात्र काही मानव चमत्काराला भाळणाऱे आहेत, त्यातच त्यांचे मन निमग्न झाले आहे. क्वचितच सताच्या मागे जाणारे आहेत. त्यातही त्यांना आठवण राहत नाही. ते ही चुकतात. म्हणून कर्तव्याची दिशा कोणती आणि कशी? हे एकाएकी सांगता येणार नाही. जशी दिशा आखली जाते, तशी घडण करून कर्तव्य करून घ्यावी लागते.
मायेच्या आधीन बनलेला अघोर मानव कर्तव्य काय करणार? जडत्व संपत्तीचे ओझे घेऊन का तो जाणार आहे? म्हणून सेवेकऱ्याने ध्यानधारणा आणि भक्तीचे जे मूळ दिलेले आहे त्याचा उजाळा करणे. भक्ती ही संशय रहित, कल्पना रहित, निष्काम अशी आहे. जो निष्काम तऱ्हेने जातो त्याला ती दूर नाही. दूर जरी असली तरी सर्वांठायी मी कसा आहे हे तो पाहू शकतो. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने वाटचाल करणे कर्तव्य आहे. (समाप्त) ©️