श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, त्याठिकाणी त्याची छाया आहे. मनुष्य नसेल, तर त्याची छाया नाही. तसेच हे त्रिगुण आहेत. त्यांची पण छाया असणारच ! प्रत्येक तत्वाला अधिकार दिलेत. त्याची हेळसांड झाल्यामुळे, त्यांना सुद्धा शासन देण्याचे सामर्थ्य कोणाजवळ तरी आहे? ते कोण करते? अशा तत्वांना शासन करण्याचे सामर्थ्य आहे, तेच ते अखंड तत्त्व ! त्यांना सुद्धा छाया असणारच नाही का? ज्याठिकाणी दिवा आहे, त्याठिकाणी प्रकाश आहे. त्याप्रमाणे मी अखंड आहे. प्रकाश पण अखंड आहे. तो प्रकाश, अखंड तत्त्व आणि अखंड तत्त्वाची छाया ! त्या छायेच्याच अनुसंधनाने ज्यांना शरण आहात, त्यांनी खूण दाखविली, त्याप्रमाणे वाटचाल करणे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे की नाही?
ज्याप्रमाणे अघोर आहे, त्याप्रमाणे सत पण आहे. सत आणि असत यांचे झगडे किती वर्षापासून चालू आहेत आणि चाललेले आहेत? पण सताला पूर्णत्वाने माहिती आहे की असताचे कर्तव्य कोणत्या तऱ्हेने घ्यावे? त्यांनी धीर सोडला का? ते गांगरले का? नाराज आहेत का? पण इतकेच की, जडत्वाला त्याचा फार त्रास होतो. त्याप्रमाणे मला पण त्रास होतो. माझ्या त्रासाचा विधी निषेध नसतो. कारण सेवेकरी म्हणा, आसनाधिस्त म्हणा, म्हणतात, “समर्थांना कसला त्रास आहे?” कारण का तर, पाहता येते, पण धरायला गेले तर सापडत नाही. काहीच करता येत नाही. मग त्यांच्यावर बोजा कसला? तरी पण मला त्रास आहे की नाही, तो मी सेवेकऱ्यांना, आसनाधिस्तांना सांगून होणार नाही.(पुढे सुरु….२) ©️