Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

संसार ©️

संसार ©️

मालिक – सेवेकऱ्यांनी संसारात राहूनच परमार्थ साधण्याचा प्रयत्न करणे. तो कोणत्या तऱ्हेने? प्रत्येक सेवेकऱ्याला संसार आहे, मुलें, माणसें आहेत. मायावी जाळ्यात चालू परिस्थितीच्या मानाने संसार करणे फारच कठीण आहे आणि तो करुनच परमार्थ साधावयाचा आहे. आपले सेवेकरी संसार करून परमार्थ कोणत्या तऱ्हेने साधतील?

संसार करीत असताना प्रत्येक सेवेकऱ्याची अशी भावना होते, हा संसार नसेल तर बरे होईल! तरी त्याच्या मानाने त्याला थोडी फार पाहणी करावी लागते. तरी सुद्धा संसारात राहून, जो जो वेळ मिळतो, त्या त्या वेळी नामात स्थिर बसावे. सेवेकऱ्यांनी केलेले कष्ट, त्याच्या ठिकाणी आलेला थकवा, कोणत्याही तऱ्हेने वाटणार नाही. संसारातील प्रत्येक कार्य करताना, आपल्या मुखांत अखंड नामाचा ध्वनी असावा.

ज्या वेळेस रोमारोमात अखंड नाम, प्रकाश, तेज अशी स्थिती होईल, त्यावेळेला त्याच्या तोंडावर एक प्रकारचे तेज उत्पन्न होईल. त्याच वेळेला सेवेकरी परमार्थाचा शोध घेईल.

संसारात अनेक प्रकारची संकटे येतात, त्याकडे लक्ष न देता, मी समर्थांचा सेवेकरी आहे. जरी संकटे आलीत, तरी ती बाजूला करणारे मालिक आहेत, हे प्रत्येक सेवेकऱ्यांने आपल्या ध्यानात ठेवणे. सेवेकऱ्यांच्या आजूबाजूच्या, शेजारच्या ज्योती विचित्र असतात. त्या सेवेकऱ्याला खाली आणण्यासाठी अनेक प्रकारच्या हुलकावण्या दाखवितात. त्याला फसविण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करतात. त्याला सेवेकऱ्याने फसावयाचे नाही. हे सेवेकऱ्यांने ध्यानात ठेवणे. ©️

You cannot copy content of this page