धर्मो रक्षति रक्षित: || अधर्मावर धर्माचा विजय, अंध:कारावर उष:कालाची मात || विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
साधु संत येती घरा, तोची दिवाळी-दसरा ! असे म्हटले जाते. खरंय का हो? आजकाल साधु संत आपणांस पहायला मिळतात कां? ह्याचे उत्तर ज्याचे त्याने शोधावे. हे जरी खरे असले तरी आज भारतीय कालगणनेनुसार दसरा आहे. आपणांस सीमोल्लंघन केले पाहिजे, म्हणजेच दुष्टापासून दूर व सुष्टाच्या जवळ जावयास हवे, तरच खऱ्या अर्थाने आपण दसरा साजरा करु शकू.असतावर मात, अशुद्धापासून सुटकारा, असभ्यतेला दूर सारले पाहिजे म्हणजे मग आपण सताच्या जवळ जाऊ, सताला पाहू शकू. सन्मार्गाने वाटचाल करु शकू. सताला डोळे भरून पाहणे, याच्या व्यतिरिक्त दुसरा मुक्ती मोक्ष तो कोणता? अशाप्रकारे आपण ह्या वर्षी गेले नऊ दिवस जो उत्सव मुळाश्रमामध्ये साजरा केला, त्यांची काही क्षणचित्रे व विडीओ येथे समस्तांसाठी प्रस्तूत केले आहेत.